Ticker

6/recent/ticker-posts

धक्कादायक! गुटखा खाताना पत्नीनं हटकलं; पतीनं तिच्यावर गोळ्या झाडल्या

मेरठ: उत्तर प्रदेशच्या जिल्ह्यातील हस्तिनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या सहा महिन्यांनंतर एका तरुणाने आपल्या पत्नीवर गोळ्या झाडल्या. तिनं पतीला गुटखा खाण्यापासून रोखलं. पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिची प्रकृती गंभीर आहे. महिलेच्या वडिलांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. हस्तिनापूरच्या लालसिंह नगरमध्ये राहणाऱ्या रणवीर सिंह यांची मुलगी काजलचं लग्न सहा महिन्यांपूर्वी गणेशपूर गावातील नेत्रपाल यांचा मुलगा लोकेश याच्यासोबत झालं होतं. लोकेशला दारू आणि गुटख्याचं व्यसन होतं. तर काजल त्याच्या व्यसनांना वैतागली होती. लग्नानंतर तिला लोकेशच्या गुटख्याच्या व्यसनाबाबत माहिती झालं. ती त्याला गुटखा खाण्यापासून रोखायला लागली. यावरून सुरुवातीला त्यांच्यात खटके उडत होते. मात्रस त्यानंतर गुटखा खाण्यावरून या दाम्पत्यामध्ये दररोज भांडण होत असे. लोकेश शुक्रवारी दुपारी गुटखा खाऊन घरी आला. त्याला पाहून पत्नी काजलला राग आला. काजलने त्याला हटकले. त्यामुळे रागाने त्याने पिस्तुलातून पत्नी काजलवर गोळ्या झाडल्या. यामुळे खळबळ माजली. कुटुंबीयांनी काजलला जखमी अवस्थेत तात्काळ रुग्णालयात नेले. तिथे संध्याकाळी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. काजलच्या वडिलांनी लोकेशविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी लोकेशला पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती हस्तिनापूर पोलीस ठाण्याचे प्रमुख धर्मेंद्र सिंह यांनी दिली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3hHOXIu

Post a Comment

0 Comments