Ticker

6/recent/ticker-posts

हे तर राहुल गांधींचं नेतृत्व बोथट करण्याचं षडयंत्र; निरुपम यांची टीका

मुंबई: नेते राहुल गांधी यांचं नेतृत्व बोथट करण्याचं काम काही नेते करत आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी आता अध्यक्षपदाचा हट्ट सोडू नये, असा सल्ला काँग्रेस नेते यांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचं उघड झालं आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा यांना पत्र लिहून काँग्रेसच्या २३ नेत्यांनी काँग्रेसचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांनी या नेत्यांचा समाचार घेतानाच राहुल गांधी यांना अध्यक्षपद स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे. हे पत्रं म्हणजे राहुल गांधी यांचं नेतृत्व बोथट करण्याचं षडयंत्र आहे. जे षडयंत्र बंद खोलीत रचल्या जायचं ते आता एका पत्राच्या माध्यमातून रचलं गेलं आहे. यावर एकच उपाय आहे. तो म्हणजे राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची जिद्द सोडू नये आणि राज्यांमधील काँग्रेसची होणारी पडझड थांबवावी. आता काँग्रेसला केवळ राहुल गांधीच वाचवू शकतात, असं निरुपम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. निरुपम यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका करतानाच राहुल गांधी यांची भक्कम बाजू घेतल्याने काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचं उघड झालं आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनिष तिवारी, शशी थरूर, मुकूल वासनिक, जितेंद्र प्रसाद, भूपिंदर सिंग हुड्डा, राजेंद्र कौर भट्टल, विरप्पा मोईली, पृथ्वीराज चव्हाण, पी. जे. कुरीयन, अजय सिंह, रेणुका चौधरी, राज बब्बर, मिलिंद देवरांसह अनेक नेत्यांची या पत्रावर सही आहे. भाजपचा मुकाबला करायचा असेल आणि देशावरील आर्थिक आरिष्ट रोखायचं असेल तर काँग्रेसला उभं राहणं गरजेचं आहे. त्यासाठी काँग्रेसमध्ये समग्र बदल व्हायला हवा. खालच्या स्तरापासून वरपर्यंत नेतृत्वात बदल करण्यात यावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. काँग्रेस पूर्ण वेळ आणि परिणामकारक नेतृत्वाची गरज असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेचन निवडणुकीद्वारे काँग्रेसचे पदाधिकारी निवडण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. उद्या काँग्रेसची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर या मागणीला महत्त्व आलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3j9iETg

Post a Comment

0 Comments