
नवी दिल्ली : केंद्रीय यांना 'ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स' () रुग्णालयातून देण्यात आलाय. गृहमंत्री अमित शहा यांची प्रकृती आता उत्तम असून त्यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाईल, असं रविवारी 'एम्स'कडून सांगण्यात आलं होतं. करोनातून बरं झाल्यानंतर १८ ऑगस्ट रोजी हलका ताप आल्यानं शहा यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वासोच्छवासातही अडथळा जाणवत होता. जवळपास १२ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. उल्लेखनीय म्हणजे, २ ऑगस्ट रोजी अमित शहा असल्याचं समोर आलं होतं. स्वत:च एका ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली होती. त्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १४ ऑगस्ट रोजी त्यांची करोना चाचणी नेगेटिव्ह आल्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं होतं. त्यानंतर ते आपल्या घरीच 'आयसोलेशन'मध्ये होते. परंतु, करोनावर मात केल्यानंतर पुन्हा प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणानं अमित शहा यांना १८ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वाचा : वाचा : दरम्यान, गृहमंत्री अमित शहा रुग्णालयात असतानाच दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी गृह सचिव अजय भल्ला यांना एक पत्र लिहून 'गृह मंत्रालयाकडून दिल्लीच्या अधिकाऱ्यांवर दिल्लीत चाचणी आणखी वाढवल्या जाऊ नयेत यासाठी दबाव टाकण्यात येतोय' असा आरोप केला होता. 'हे पत्र माननीय गृह मंत्री अमित शहा यांनाच लिहिणार होतो, परंतु त्यांची तब्येत बरी नसल्यानं आणि ते एम्समध्ये दाखल असल्यानं मी हे पत्र तुम्हाला लिहितोय, असंही त्यांनी अजय भल्ला यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. दरम्यान, देशातील करोनाबाधितांचा आकडा आता ३५ लाख ४२ हजार ७३३ वर पोहचलाय. यातील एकूण २७ लाख १३ हजार ९३३ रुग्णांवर उपचार यशस्वी ठरलेत तर ६३ हजार ४९८ जणांचा मृत्यू झालाय. सध्या देशात ७ लाख ६५ हजार ३०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाचा : वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2G3dDNx
0 Comments