Ticker

6/recent/ticker-posts

मुस्लिमांवरील अन्यायाचा 'हा' एक घ्या पुरावा: असदुद्दीन ओवेसी कडाडले

नवी दिल्ली: ऑल इंडिया मजलिस-ए-एत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) पक्षाचे नेते आणि हैदराबादचे खासदार () यांनी तुरुंगात कैद असलेल्या मुस्लिमांच्या संख्येशी संबंधित एक बातमी ट्विट केली आहे. मुस्लिम पुरुषांना (Muslim males) मोठ्या संख्येने आधीपासूनच कैद () करून ठेवण्यात आले आहे, मात्र आता त्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. कायद्याच्या नजरेत हे लोक निर्दोष आहेत, मात्र आताही ते अनेक वर्षे तुरुंगाचा सामना करत आहेत. हा यंत्रणेद्वारे होणाऱ्या अन्यायाचा आणखी एक पुरावा आहे, ज्या अन्यायाचा आम्ही सामना करत आहोत, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. असदुद्दीन ओवेसी यानी इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी दैनिकात आलेली एक बातमी ट्विट करत हा मुद्दा उपस्थित केला आहे. या बातमीनुसार, राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने () देशभरातील तुरुंगांमध्ये बंद असलेल्या कैद्यांची आकडेवारी प्रसिद्ध केली होती. त्या आकड्यांवरून तुरुंगात बंद असलेल्या मु्लिम, दलित आणि आदिवासींची संख्या देशातील त्यांच्या लोकसंख्येच्या टक्केवारीहून वेगळीच आहे. तर इतर मागासवर्गीय (OBC) आणि उच्च जातींबाबत मात्र असे चित्र नाही. क्लिक करा आणि वाचा बातमी- इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मुस्लिम समुदायातून तुरुंगात आलेले लोक हे दोषी असण्यापेक्षा ज्यांच्यावर खटले सुरू आहेत असे कैदी अधिक आहेत, असे सन २०१९ च्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. २०१९ या वर्षांच्या शेवटपर्यंत तुरुंगात कैद असलेल्या सर्व दोषींमध्ये दलितांची संख्या २१.७ टक्के इतकी आहे. ज्यांच्यावर खटले सुरू आहेत अशा दलित समाजातील लोकांची संख्या २१ टक्के इतकी आहे. १४.२ टक्के इतकी लोकसंख्या असलेल्या मुस्लिमांपैकी एकूण १६.६ टक्के कैदी आहेत. यांपैकी १८.७ टक्के लोकांवर खटले सुरू आहेत. क्लिक करा आणि वाचा बातमी: क्लिक करा आणि वाचा बातमी-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lCgrlk

Post a Comment

0 Comments