
मुंबई- प्रकरणाचा तपास आता सीबीआयने आपल्या हाती घेतला आहे. पहिल्या दिवसापासूनच सीबीआयची टीम जोमाने कामाला लागली आहे. प्रत्येक साक्षीदाराचा आणि संशयीतांचा पुन्हा जबाब नोंदवला जात आहे. दरम्यान एका प्रत्यक्षदर्शीने संदीप सिंह संदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे. मुंबईतील करणी सेनेचे६ उपाध्यक्ष सुरजितसिंह राठोड यांनी टाइम्स नाऊशी बोलताना दावा केला की, सुशांत प्रकरणात संदीप सिंहची वागणूक संशयास्पद आहे. कूपर इस्पितळाच्या इथे, संदीप सिंह आणि पोलिसांमध्ये दुबईसंदर्भात बोलणं झाल्याचा दावा राठोड यांनी केला. सीबीआयच्या रडारवर आहे संदीप सिंह पहिल्या दिवसापासून संदीप सिंह सीबीआयच्या रडारवर आहे. असं म्हटलं जातं की, सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या फ्लॅटमध्ये पोहोचणाऱ्यांमध्ये संदीपही होता. या दरम्यान. संदीपचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यात तो सुशांतचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पोलिसांना थम्सअप करताना दिसत आहे. याशिवाय वृत्तवाहिनीवरही संदीपने आपली विधानं वारंवार बदलली आहेत. १५ जून रोजी रियासोबत शवागारात गेला होता सरजित सुरजितसिंह पुढे म्हणाले की, ते १५ जून रोजी कूपर इस्पितळात गेले होते. करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष यांनी त्यांना रियासोबत जाण्यास सांगितले. सुरजित म्हणाले की, ‘कर्मचार्यांना विनंती केल्यानंतरच रियाला सुशांतचा मृतदेह पाहण्यासाठी देण्यात आला होता. रियाने सुशांतला पाहिल्यावर तिने त्याच्या छातीवर हात ठेवला आणि सॉरी बाबू फक्त एवढंच म्हणाली. 'संदीपने विचारले तू कोण आहेस' सुरजितच्या म्हणण्यानुसार त्यांना इस्पितळाच्या बाहेर संदीप सिंह भेटला होता. संदीपने त्यांना तुम्ही कोण असा प्रश्नही विचारला. यावर आपण करणी सेनेचा सदस्य असल्याचे सुरजितने सांगितले. हे ऐकल्यावर संदीप अचानक तिथून निघून गेला. त्यावेळी तिथे कागदपत्रांची कारवाई होत होती. 'मला येथून काढायला पोलिसांना सांगितले' सुरजित पुढे म्हणाले की, त्यावेळी संदीप तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांकडे गेला. तिथे पोलीस आणि संदीप यांच्यात दुबईवरूनही काही गोष्टी झाल्या. संदीपने पोलिसांना मला तेथून काढण्यास सांगितले. जेव्हा पोलीस माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांना सांगितले की मी करणी सेनेचा सदस्य आहे आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी इथे आलो आहे.’
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3gq1Wgm
0 Comments