Ticker

6/recent/ticker-posts

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीला सीबीआयकडून समन्स

मुंबई: बॉलिवूड अभिनेता याच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी सुरू असून, त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीला सीबीआयने समन्स बजावले आहेत. सीबीआयचे पथक सध्या सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाशी संबंधित सर्व व्यक्तींची चौकशी करत आहे. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याची मैत्रीण ही मुख्य आरोपी मानली जातेय. दुसरीकडे, रिया एका मुलाखतीत सुशांत आणि त्याच्या कुटुंबीयांमधील नात्यावर बोलली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीबीआयचे पथक सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची चौकशी करत आहे. सुशांतने आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली याचा तपास केला जात आहे. सीबीआयचे पथक सुशांतच्या घरीही गेले होते. तेथे त्यांनी 'क्राइम सीन रिक्रीएट'ही केला होता. सीबीआयचे पथक आठव्या दिवशी तपासासाठी डीआरडीओ गेस्ट हाऊसला पोहोचली आहे. आज, शुक्रवारी रिया चक्रवर्ती हिची या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. व्यतिरिक्त या प्रकरणात ईडीही तपास करत आहे. याआधी गुरुवारी सीबीआयने रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती याची तब्बल १४ तास चौकशी केली होती, अशी माहिती मिळते. गुरुवारीच रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांचीही ईडीने चौकशी केली होती. दरम्यान, रिया चक्रवर्ती ही डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहोचली आहे. रिया आता सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर होणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2QyXame

Post a Comment

0 Comments