Ticker

6/recent/ticker-posts

भारत बंद Live: डावे पक्ष, कामगारांनी ट्रेन रोखल्या

मागे घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज देशातील शेतकऱ्यांनी पुकारलेले आंदोलन सुरू झाले आहे. शेतकऱ्यांच्या या बंदला सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगण, झारखंड आणि दिल्लीत हा बंद मोठ्या प्रमाणावर पाळण्यात येत आहे. लाइव्ह अपडेट्सच्या माध्यमातून पाहुया, देशभरात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदची ताजी स्थिती काय आहे... Live अपडेट्स... >> देशभरात शेतकऱ्यांचा बंद सुरू असताना भारतीय जनता पक्षानेही बंगालमध्ये १२ तासांचा बंद घोषित केला आहे. भाजप कार्यकर्त्याच्या हत्येचा निषेध म्हणून हा बंद पाळण्यात येत आहे. >> भुवनेश्वर रेल्वे स्थानकावर डावे पक्ष, कामगार संघटनांनी ट्रेन थांबवल्या >> शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे मुख्य केंद्र बनलेल्या दिल्लीत या 'भारत बंद' आंदोलनाचा सर्वात मोठा परिणाम जाणवू शकतो. >> राजस्थानात सत्तारुढ काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे समर्थन केले आहे. राज्यातील सर्वात मोठ्या महामार्गावर बंदचा परिणाम पाहायला मिळू शकतो. >> महाराष्ट्रात सत्तारुढ शिवसेना, कांग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे समर्थन केले आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कार्यालये बंद राहणार आहेत. राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील ग्रामीण भागांमध्ये देखील बंदचा परिणाम पाहायला मिळू शकतो. >> बंद पाळणाऱ्या राज्यांमध्ये प्रामुख्याने पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगण, झारखंड आणि दिल्लीचा समावेश आहे. >> आज सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत भारतभर हा बंद पाळला जाणार आहे. >> कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज देशातील शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. बंद पाळणाऱ्या राज्यांमध्ये पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगण, झारखंड आणि दिल्लीचा समावेश आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/36YUmbn

Post a Comment

0 Comments