कॅनबेरा : पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला. कारण या सामन्यात नाबाद ४४ धावांची धडाकेबाज खेळी साकारणाऱ्या रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्याला आता ट्वेन्टी-२० मालिकेत खेळता येणार नाही. त्यामुळे आता जडेजाच्या जागी एका भारतीय संघा युवा गोलंदाजाची संघात एंट्री झाली आहे. पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात फलंदाजी करताना जडेजाच्या पायांचे स्नायू दुखावले होते. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे तो या सामन्यात गोलंदाजी करू शकत नव्हता. जडेजाच्या जागी चहलला भारतीय संघात स्थान देण्यात आले आणि त्याने गोलंदाजीही केली. पण आता आगामी दोन सामन्यांसाठी संघात मुंबईकर युवा गोलंदाज शार्दुल ठाकूरची एंट्री झाली आहे. शार्दुलने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी केली होती. या सामन्यात संधीचे सोने करत त्याने तीन विकेट्स मिळवल्या होत्या आणि तो मॅचविनर ठरला होता. तिसऱ्या सामन्यात शार्दुलने सर्वात कमी धावा देत सर्वात जास्त विकेट्स मिळवल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात शार्दुलने १० षटकांमध्ये ५३ धावा देत ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना बाद केले. या तीन फलंदाजांमध्ये गेल्या दोन्ही सामन्यात शतके झळकावणाऱ्या स्टीव्हन स्मिथचाही समावेश होता. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलला पहिल्या ट्वेन्टी सामन्यात अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली नव्हती. पण या सामन्यात नाबाद ४४ धावांची धडाकेबाज खेळी साकारणाऱ्या रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती. जडेजाच्या जागी चहलला बदली खेळाडू म्हणून भारतीय संघात स्थान देण्यात आले आणि त्याने या संधीचे सोने केले. चहलने या सामन्यात चार षटकांमध्ये २५ धावा देत तीन विकेट्स मिळवले आणि हाच सामन्याच्या टर्निंग पॉइंट ठरला होता. पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला. या विजयासह भारताने ट्वेन्टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, यावर सर्वांचे लक्ष असेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2L4MqfT

0 Comments