
मुंबई : सलग सहा दिवस केलेल्या इंधन दरवाढीनंतर झालेल्या टीकेने आज पेट्रोलियम कंपन्यांनी सावध भूमिका घेतली. कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवला. मागील सहा दिवसांत पेट्रोल १.३७ रुपये आणि डिझेल १.४५ रुपयांनी महागले आहे. दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. याला देशभरातील विरोधी पक्ष आणि विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. सरकारच्या निर्णयांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. इंधन दरवाढीवरून देखील सरकारवर टीका होत आहे. पेट्रोल ९० च्या पुढे गेल्याने सरकारवर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. आज ठेवल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ९०.३४ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.५१ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३.७१ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.८७ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव ८६.५१ रुपये झाला असून डिझेल ७७.४४ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.१९ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे. जागतिक बाजारात मात्र कच्च्या तेलाची दरवाढी तूर्त थांबली आहे. तेलाचा भाव प्रती बॅरल ०.१७ डॉलरने कमी होऊन तो ४५.५९ डॉलर झाला. ब्रेंट क्रूडचा भाव ०.४६ डॉलरने कमी झाला आणि तो प्रती बॅरल ४८.७९ डॉलर झाला. ओपेक देशांनी तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज ५० लाख पिंप तेलाचे उत्पादन वाढवले जाणार आहे. यामुळे जागतिक बाजारात खनिज तेलावरील दबाव वाढला असल्याचे जाणकारांनी सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2VXob5r
0 Comments