
नवी दिल्ली: भारतात विषाणूचा () संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९७ लाखांच्या पुढे पोहोचली आहे. देशभरात गेल्या २४ तासांमध्ये () चे एकूण २६ हजार ५६७ नवे रुग्ण आढळळे आहेत. या व्यतिरिक्त गेल्या २४ तासांमध्ये देशभरात करोनामुळे एकूण ३८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभरात आतापर्यंत एकूण ९७ लाख ३ हजार ७७० जणांना करोनाची लागण झालेली आहे. तर आतापर्यंत देशातील एकूण १ लाख ४० हजार ९५८ लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३९ हजार ४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यांना उपचारानंतर रुग्णालयांतून सुट्टी देण्यात आली. आता पर्यंत एकूण ९१ लाख ७८ हजार ९४६ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. म्हणजेच, नव्या संसर्गापासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सध्या देशात ३ लाख ८३ हजार ८६६ सक्रिय रुग्णांची संख्या आहे. देशात करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत तीव्र गतीने सुधारणा होत असल्याचे दिसत आहे. एक दिवसापूर्वी म्हणजेच सोमवारी कोविड-१९ चे एकूण ३२ हजार ९८१ नवे रुग्ण आढळले होते, तर एकूण ३९१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. दोन्ही संख्येत आज घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये ज्या पाच राज्यांमध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले, अशा राज्यांमध्ये केरळ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि दिल्लीचा समावेश आहे. केरळमध्ये करोनाची ३,२७२ इतकी रुग्णसंख्या असून महाराष्ट्रात ३,०७५, पश्चिम बंगालमध्ये २,२१४, राजस्थानात १,९२७ तर, दिल्लीत १,६७४ रुग्ण आहेत. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, दिल्लीत कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर राष्ट्रीय सरासरीच्या पुढे पोहोचला आहे. करोनाचा रुग्ण बरे होण्याचा दर दिल्लीत ९४.५७ टक्के इतका असून, देशात हा दर ९४.४४ टक्के इतका आहे. दिल्लीतील करोनाचे सक्रिय रुग्णससंख्येची टक्केवारी देखील देशाच्या तुलनेत कमी आहे. दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या ३.७८ टक्के इतकी आहे, तर देशात सक्रिय रुग्णांची संख्या ४.०९ टक्के इतकी आहे. क्लिक करा आणि वाचा - क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/36UUAjt
0 Comments