
मुंबई: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने काल दुसऱ्या टी-२० सामन्यात () विजय मिळवून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतील. याआधी भारताने वनडे मालिका गमावली होती. तेव्हा चाहते भारतीय संघावर टीका करत होते. त्याच बरोबर सर्वांना हिटमॅन () ची आठवण येत होती. रोहित असता तर सामन्याचा निकाल बदलला असतास असेच सर्वांना वाटत होते. त्यानंतर भारताने तिसऱ्या वनडेत आणि त्या पाठोपाठ सलग दोन टी-२० लढती जिंकल्या. वाचा- भारतीय संघाने सलग १० टी-२० लढती जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारताच्या या विजयावर संघातील स्टार फलंदाज रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघाने मलिकेत जबरदस्त विजय मिळवला आहे. ज्या पद्धतीने भारताने हा विजय मिळवला आहे ते पाहून छान वाटले. या विजयासाठी सर्वांचे अभिनंदन, असे रोहितने ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने बीसीसीआयला टॅग केले आहे. वाचा- दुखापतीमुळे रोहित शर्मा वनडे आणि टी-२० मालिकेसाठी संघात नाही. कदाचीत तो कसोटी मालिकेला देखील मुकण्याची शक्यता आहे. भारतीय संघाच्या विजयावर रोहितने केलेले ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि चाहते देखील त्यावर प्रतिक्रिया देत आहे. वाचा- ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रथम रोहित शर्माची निवड करण्यात आली नव्हती. त्यावरून बराच वाद झाला. त्यानंतर वनडे आणि टी-२० साठी त्याला विश्रांती देण्यात आली आणि कसोटी संघात स्थान दिले गेले. पण तो फिट नसल्याने पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. या दरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात सर्व काही ठिक नसल्याची चर्चा सुरू झाली. अखेर या सर्वावर बीसीसीआयला स्पष्टीकरण द्यावे लागले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/37MICIa
0 Comments