Ticker

6/recent/ticker-posts

जम्मू-काश्मीर: ट्रकमधून येत होते दहशतवादी, जवानांनी चौघांना केले ठार

जम्मू/श्रीनगर: जम्मू जिल्ह्याच्या नगरोटा भागात दहशतवादविरोधी अभियानात सुरक्षादलांना मोठे यश मिळाले आहे. गुरुवारी पहाटे झालेल्या चकमकीच झाले आहेत. हे अभियान अजूनही सुरूच आहे. हे दहशतवादी एका ट्रकमध्ये बसून येत होते, असे सांगितले जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षादलांनी माहिती मिळाल्यानंतर बन टोल प्लाझाजवळ एक नाका उभारला. दहशतवादी अंधाराचा फायदा उठवत जाण्याच्या तयारीत होते. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास गाड्यांच्या तपासणीदरम्यान दहशतवाद्यांच्या एका गटाने सुरक्षादलावर गोळीबार करणे सुरू केले. यानंतर चकमकच सुरू झाली. याबाबत वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झालेल्या वृ्त्तांनुसार, हे दहशतवादी एका ट्रकमध्ये बसले होते. ट्रकमधूनच ते जवानांवर गोळीबार करत होते. उत्तरादाखल सुरक्षादलांच्या जवानांनी हा ट्रकच उडवून दिला. यानंतर दहशतवादी जवळच्या जंगलात पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला. क्लिक करा आणि वाचा- या संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे. या बरोबरच श्रीनगर जाणारा महामार्गही बंद करण्यात आला आहे. अभियान अजूनही सुरू आहे. आतापर्यंत ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. या चकमकीनंतर उधमपूर जिल्ह्यात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2UCyc7C

Post a Comment

0 Comments