 
मुंबई : आज मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि ७६.८६ रुपये प्रती लीटर कायम आहे. दरम्यान सीएनजी दरात मात्र महिनाभरापूर्वी एक रुपयाची कपात झाली. मुंबईत सीएनजीचा दर प्रती किलो ४७.९ रुपये झाला आहे. त्याआधी तो ४८.९ रुपये होता. त्यानंतर सीएनजी दरात देखील महिनाभरापासून कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून डिझेलचा भाव ७०.४६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७५.९५ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७३.९९ रुपये प्रती लीटर झाले आहे. जवळपास ५८ दिवसांपूर्वी कंपन्यांनी पेट्रोल दरात बदल केला होता. तर ४८ दिवसांपूर्वी डिझेल दरात कपात केली होती. फायजरपाठोपाठ मॉडर्ना या कंपनीने करोना लसीची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केला आहे. करोना लस ९४.५ टक्के परिणामकारक असल्याचा दावा मॉडर्न या कंपनीने केला आहे. करोना लसीची यशस्वी चाचणी करणारी मॉडर्ना दुसरी अमेरिकन कंपनी ठरली आहे. करोना प्रतिबंधात्मक लशीच्या यशस्वी चाचणीने गुंतवणूकदारांमध्ये आशेचे किरण निर्माण झाला आहे. तेलाच्या किमतीतील घसरण रोखण्यासाठी तेल उत्पादक देशांची संघटना ओपेककडून उत्पादन कपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेलाचा बाजार गरम झाला आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव प्रती बॅरल ४३ डॉलर झाला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2IUsqvl
 

 
0 Comments