Ticker

6/recent/ticker-posts

शोरूम मालकाच्या मुलीला पाठवायचा अश्लील व्हिडिओ, अखेर तिने...

मेरठ: उत्तर प्रदेशच्या मेरठमधील लालकुर्ती परिसरात एका शोरूममध्ये काम करणाऱ्या नोकराने आपल्या मालकाच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंस्टाग्रामच्या माध्यमातून तो तिला अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवून तिला त्रास देत होता. अखेर तिने आपल्या कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला. त्यांनी तक्रार केल्यानंतर पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली. मुलीला अश्लील व्हिडिओ पाठवून त्रास देणारा हा शोरूममधील नोकर असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तात्काळ नोकराला आणि त्याच्या मित्राला अटक केली. लालकुर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शोरूममध्ये काम करणाऱ्या राजकुमार याने आपल्या मालकाच्या मुलीला इंस्टाग्रामवर अश्लील मेसेज पाठवले. सुरुवातीला समोरून काही उत्तर आले नाही. राजकुमारने कुंठा येथून तिला अश्लील व्हिडिओ पाठवले. शोरूमच्या मालकाच्या मुलीने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, वारंवार अशा प्रकारचे व्हिडिओ येऊ लागल्याने तिने याबाबत कुटुंबीयांना सांगितले. शोरूमच्या मालकाने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस सायबर सेलच्या मदतीने आरोपीपर्यंत पोहोचले. आरोपी हा शोरूममध्ये काम करणारा नोकर निघाल्याने सर्वांना धक्काच बसला. बनावट आयडीद्वारे पाठवत होता अश्लील व्हिडिओ आरोपी राजकुमार हा बोगस आयडीद्वारे मालकाच्या मुलीला अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवत असल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. यात त्याला मित्रही मदत करत होता. पोलिसांनी राजकुमारसह त्याच्या मित्रालाही अटक केली. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असून, त्यांना कोठडी सुनावली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/35UOfUV

Post a Comment

0 Comments