नवी दिल्ली: देशात करोनाची लागण झालेल्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या ९० लाख ९५ हजारांवर पोहोचली आहे. मात्र, यांपैकी आतापर्यंत एकूण ८५ लाख रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने आज रविवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये चे एकूण ४५ हजार २०९ इतके नवे रुग्ण आढळले आहेत. या बरोबर देशातील एकूण रुग्णसंख्या ९० लाख ९५ हजार ८०६ वर पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये एकूण ५०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभरात करोनामुळे आतापर्यंत एकूण १ लाख ३३ हजार २२७ इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, करोना रुग्ण बरे होण्याचा दर ९३.६८ टक्के इतका झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये ४३ हजार ४९३ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ८५ लाख २१ हजार ६१७ इतक्या रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आज बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत दररोज नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. देशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ४० हजार ९६२ इतकी आहे. तर देशाचा पॉझिटीव्हीटी दर आहे ४.२ टक्के. सर्वाधिक रुग्णवाढ दिल्लीत गेल्या २४ तासांमध्ये ज्या पाच राज्यांमध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले, त्यांमध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्ली अव्वल स्थानी आहे. दिल्लीत सर्वाधिक ५ हजार ८७९ नवे रुग्ण आढळले. यानंतर केरळमध्ये ५ हजार ७७२ रुग्ण आढळले , तर महाराष्ट्रात ५ हजार ७६० नवे रुग्ण, पश्चिम बंगालमध्ये ३ हजार ६३९ नवे रुग्ण आणि राजस्थानात ३ हजार ००७ इतके नवे रुग्ण आढळले. क्लिक करा आणि वाचा- गेल्या २४ तासांमध्ये ज्या राज्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत, अशांमध्ये दिल्लीच अव्वल स्थानी आहे. दिल्लीत १११ रुग्णांचा मृत्यू झाला असून दुसऱ्या स्थानी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये ५३, केरळ आणि हरयाणात प्रत्येकी २५-२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2J3K5RG

0 Comments