Ticker

6/recent/ticker-posts

आता सायन्सच्या मदतीने आई होणार मोना सिंग, लग्नाच्याआधीच घेतलेला निर्णय

मुंबई- '' अभिनेत्री मोना सिंगने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये श्याम गोपालनशी लग्न केलं. वयाच्या ३९ व्या वर्षी लग्न केलेल्या मोना सिंगला आता बाळाबद्दल अजिबात चिंता नाही, कारण तिने ३४ वर्षांची असतानाच त्याचं योग्य ते नियोजन केलं होतं. याबद्दल बोलताना म्हणाली की, ती सध्या तिच्या विवाहित जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी लग्न करण्याबद्दल मोना म्हणाली की, 'आपण आता एका नवीन जगात राहत आहोत जिथे लग्नासाठी कोणतंही वय नाही. मला घाई नव्हती. मला वाटतं की लग्नासाठी ते माझं सर्वोत्तम वय होतं. कारण तेव्हा आपण अधिक हुशार आणि अनुभवी असतो. या वयापर्यंत आपण आयुष्यातले अनेत चढ- उतार पाहिलेले असतात. लग्न फार महत्त्वाची गोष्ट आहे. ती टिकवून ठेवली पाहिजे.' वाढत्या वयामुळे तिला बाळाबद्दलची चिंता आहे का असा प्रश्न विचारला असता तिने वयाच्या ३४ व्या वर्षीच आई होण्याच्या क्षमतेला भविष्यासाठी सुरक्षित करून ठेवलं. ( frozen eggs) ती म्हणाली की, 'आता माझं लग्न झालं आहे. मला माझ्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. जगभर फिरायचं आहे. मी आतापर्यंत हे करू शकले नाही. मी माझ्या कुटुंबासह आणि मित्रांसोबत बराच प्रवास केला. आता मला माझ्या नवऱ्यासोबत फिरायचं आहे. ही एक वेगळीच भावना आहे. पार्टनरसोबत नुसतं चालणं, त्याचं लक्ष फक्त आपल्यावर असणं, करवाचौथ करणं या सर्व गोष्टी फार सुंदर आहेत. मला स्वतःला मुल आवडतं. पण आता जर मला याबद्दल विचारलं तर मी सांगेन की यासाठी मी मानसिकदृष्ट्या तयार नाही. मी खरोखर याबद्दल विचार केला नाही.' मोना म्हणाली की माझ्या निर्णयाबद्दल जेव्हा मी आईला सांगितलं तेव्हा तिला फार आनंद झाला. 'मी आणि माझी आई दोघेही पुण्यातील माझ्या डॉक्टरांकडे गेलो. या प्रक्रियेसाठी मला काही महिन्यांपासून कामापासून विश्रांती घ्यावी लागली. कारण या प्रक्रियेमध्ये बर्‍याचदा मूड स्विंग्जदेखील होत असतात. संपूर्ण प्रक्रियेस पाच महिने लागले. आता मी असं म्हणू शकते की मी मुक्त आहे.'


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2UMtxQr

Post a Comment

0 Comments