मुंबई: सिनेसृष्टीत केला जाणारा वर्णभेद यावरुन सध्या पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अनेक कलाकार आता वर्णभेदाविरोधात उघड भूमिका घेताना दिसताहेत. अभिनेता यानं नुकताच याबाबतचा त्याचा अनुभव शेअर केला होता. आता अभिनेत्री हिनेही वर्णभेदाविषयी भाष्य केले असून सावळ्या रंगामुळे संधी नाकारण्यात आली असताना गीतकार यांनी कशी मदत केली हा किस्सा सांगितला आहे. 'सावळा रंग आणि ती दिसायला चांगला नसल्यामुळे मला सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्रींसोबत काम करण्याची संधी मिळाली नव्हती', असं यापूर्वी नवाजुद्दीननं म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर चित्रांगदानं एका मुलाखतीत तिच्या एका अनुभवाविषयी सांगितलं आहे. 'माझ्या सावळा रंगामुळे माझ्याकडून एकदा मॉडेलिंगचे काम काढून घेण्यात आलं होतं. करिअरच्या सुरुवातीच्या काळात मला हा अनुभव आला होता. दोनपैकी एका मॉडेलची निवड करताना, मला केवळ सावळ्या रंगामुळे डावलण्यात आलं होतं' असं चित्रांगदानं सांगितले. पुढे ती म्हणाली, 'सुदैवाने मी जी ऑडिशन दिली होती, ती ऑडिशन गुलजार साहेबांनी पाहिली आणि काही दिवसांनी त्यांच्या गाण्यात मला काम करण्याची संधी मिळाली. सिनेसृष्टीतील प्रत्येक व्यक्ती त्वचेचा रंग पाहून काम देत नाही हे मला त्या दिवशी लक्षात आलं.'
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3371gsA

0 Comments