
वॉशिंग्टन: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून सुरू झालेला सत्ता संघर्ष अद्यापही शमण्याची चिन्हे नाहीत. निवडणुकीतील आपला पराभव अमान्य करणाऱ्या यांनी व्हाइट हाउस सोडण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी अटसमोर ठेवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाइट हाउस सोडण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ट्रम्प यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. बायडन यांच्या बाजूने असलेल्या इलेक्टोरल कॉलेजने त्यांना मतदान केल्यास आपण व्हाइट हाउस सोडणार असल्याचे म्हटले. अमेरिकेतील निवडणुकीत निकालानुसार, डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांचा विजय झाला आहे. त्यांनी ३०३ इलेक्टोरल मते जिंकली आहेत. मात्र, अमेरिकेतील निवडणूक पद्धतीनुसार, डिसेंबर महिन्यात निवडून आलेले इलेक्टोरल प्रतिनिधी नव्या राष्ट्राध्यक्षांसाठी थेट मतदान करतील. वाचा: डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाला असल्याचा आरोप सातत्याने केला आहे. आपण व्हाइट हाउस सोडणार असलो तरी या गैरप्रकाराविरोधात आपण संघर्ष करू आणि विजयी होऊ असेही त्यांनी स्पष्ट केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेच्यावतीने विविध राज्यातील कोर्टांमध्ये मतमोजणी प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराविरोधात अनेक खटले दाखल केले आहेत. काही कोर्टांनी याचिका फेटाळून लावल्या आहेत. वाचा: वाचा: दरम्यान, सामान्य प्रशासन सेवा विभागाचे प्रमुख एमिली मर्फी यांनी सत्ता हस्तांतरणासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रिया पार पाडण्यास ट्रम्प प्रशासन तयार असल्याचे सांगितले. डेमोक्रॅटीक पक्षाच्या सदस्यांनी जो बायडन यांच्या विजयाबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी एमिली मर्फी यांना सभागृहात बोलवले होते. त्यावेळी एमिली यांनी ही माहिती दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी एमिली आणि त्यांच्या सहकाऱ्यांना प्रोटोकॉलनुसार सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडण्याची सुचना केली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून ट्रम्प यांनी सातत्याने निवडणूक आणि मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. बायडन यांनी बहुमताचा आकडा ओलांडल्यानंतरही सत्ता न सोडण्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले होते. त्यामुळे सत्ता हस्तांतरणाचा पेच निर्माण झाला होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3o3Dd5E
0 Comments