Ticker

6/recent/ticker-posts

कमॉडिटी तेजीत; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव

मुंबई : करोनाने पुन्हा डोकं वर काढल्याने आर्थिक अनिश्चितता वाढली आहे. यामुळे सलग दुसऱ्या सत्रात मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाली आहे. आज सोमवारी कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीने सकारात्मक सुरुवात केली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सध्या सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०२३३ रुपये आहे. त्यात २१ रुपयांची वाढ झाली. चांदीचा भाव एक किलोला ६२०६१ रुपये आहे. त्यात सध्या ९७ रुपयांची घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये शुक्रवारी बाजार बंद होताना सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०२६० रुपये होता. त्यात २६८ रुपयांची वाढ झाली. गुरुवारी सोने ४९९९२ रुपयांवर बंद झाले होते. चांदीमध्ये देखील तेजी दिसून आली आहे.चांदीचा भाव एक किलोला ६२२६० रुपयांवर बंद झाला होता. त्यात ७५० रुपयांची वाढ झाली होती. तत्पूर्वी झालेल्या नफावसुलीने गेल्या आठवड्यात सोने ८३९ रुपयांनी स्वस्त झाले होते. तर चांदीमध्ये २०७४ रुपयांची घसरण झाली होती. दिवाळीनंतर सोन्याची मागणी कमी झाली आणि भाव कोसळले असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात स्पॉट गोल्डचा भाव ०.२ टक्क्याने वधारला असून तो प्रती औंस १८७४.२५ डॉलर झाला. चांदीचा भाव प्रती औंस ०.४ टक्क्यांनी घसरला असून तो २४.२४ डॉलर आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या भावात नफावसुली दिसून आली. त्यामुळे सोन्याचा भाव १९०० डॉलर खाली आला आहे. नजीकच्या काळात सोन्यात चढ उतार दिसून येतील असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. goodreturns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९९१० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५०९१० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४९१७० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५३६३० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेटसाठी ग्राहकांना ५००८० रुपये मोजावे लागतील. तर २४ कॅरेटचा भाव ५२४८० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटचा सोन्याचा दर ४७६२० रुपये असून २४ कॅरेटसाठी ५२००० रुपये आहे. गुंतवणूकदारांना दमदार परतावा सोन्याने यंदा गुंतवणूकदारांना ३२ टक्के परतावा दिला आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या वेळी हा परतावा २१ टक्के होता. चालू वर्षात अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असणारे व्यापारयुद्ध आणि करोनावरील लशीच्या अपेक्षेने सोन्याच्या भावात मोठे चढउतार दिसून आले. मंगळवारी मल्टि कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) प्रति दहा ग्रॅमसाठी ५०,८४१ रुपय़ांवर बंद झाले. यंदा दिवाळीला सोन्याने गेल्या ९ वर्षांतील सर्वोत्तम परतावा दिला आहे. २०११मध्ये सोन्याने गुंतवणूकदारांना ३८ टक्के परतावा दिला होता. २०११मध्ये दिवाळीवेळी एमसीएक्स फ्युचरवर सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी २७,३५९ रुपये होता. तो यंदा ५०,६७९ रुपयांवर पोहोचला. हे लक्षात घेता सोन्याने गुंतवणूकदारांना गेल्या दहा वर्षांमध्ये ८५ टक्के परतावा दिला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2J2i9xv

Post a Comment

0 Comments