अहमदनगर: राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री () हे २२ ऑक्टोबरला नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याला आता एक महिना पूर्ण होत असून ते नगरला केव्हा येणार, हे अद्याप स्पष्ट नाहीये. त्यामुळे 'मी आधीच सांगितलं होतं की महिन्यातून किमान एकदा नगरला जिंदा किंवा मुडदा येईनच,’ हे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी १७ सप्टेंबरला केलेले वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. वाचा: पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नगर जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत असल्याची सातत्याने टीका जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत असते. नगर जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत होता. त्यावरून भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरच्या पालकमंत्र्यांना जनतेची काळजी नाही, अशी टीका सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली होती. त्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ १७ सप्टेंबरला नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले, व त्यांनी विखेंच्या टीकेचा समाचार घेतानाच त्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते. मात्र, यावेळी बोलताना 'मी आधीच सांगितलं होतं की महिन्यातून किमान एकदा नगरला जिंदा किंवा मुडदा येईनच,’ असेही मुश्रीफ म्हणाले होते. त्यातच आता २२ ऑक्टोबरनंतर नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर मुश्रीफ हे आलेले नाहीत. २२ ऑक्टोबरला मुश्रीफ यांनी जिल्ह्यात येऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या होत्या. त्यानंतर नगरमध्ये आढावा बैठक घेतली होती. मात्र, हा दौरा होऊन आता जवळपास एक महिना पूर्ण होत आला तरी ते नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले नाहीत. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुश्रीफ यांच्या ‘त्या’ वक्तव्याची चर्चा होऊ लागली आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2IZvnLw

0 Comments