
मुंबई : गेल्या आठवड्यात दरवाढीचा सपाटा लावणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी आज महिन्याच्या अखेरच्या दिवशी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. आज मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर स्थिर आहे. याआधी सलग चार दिवस कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ केली. रविवारी पेट्रोल २१ पैसे आणि डिझेल २९ पैशांनी वधारले होते. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा भाव ८९ रुपयांवर गेला होता. तर शनिवारी पेट्रोल २४ पैसे आणि डिझेल २७ पैशांनी वधारले होते. आज मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८९.०२ रुपये आणि डिझेल ७८.९७ रुपये झाला आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८२.३४ रुपये असून डिझेल ७२.४२ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ८५.३१ रुपये असून डिझेल ७७.८४ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८३.८७ रुपये आहे. डिझेलचा भाव ७५.९९ रुपये प्रती लीटर झाला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किरकोळ घसरण झाली. तेलाचा भाव प्रती बॅरल ०.१९ डॉलरने घसरला आणि ४५.५२ डॉलर झाला. ब्रेंट क्रूडचा भाव ०.३८ डॉलरने वधारला आणि प्रती बॅरल ४८.१८ डॉलर झाला. मागील नऊ दिवसात डिझेल १.९६ रुपयांनी महागले आहे. तत्पूर्वी पेट्रोलियम कंपन्यांनी सलग ४८ दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते. जागतिक बाजारात तेव्हा कच्च्या तेलाचा भाव ४० डॉलरच्या आसपास होता, मात्र गेल्या दोन आठवड्यात तेलाच्या भावात वाढ झाली. तेलाचा भाव प्रती बॅरल ४५ ते ४८ डॉलर इतका वाढला. त्यामुळे कंपन्यांनी दरवाढ करावी लागली. मागील १० पैकी ९ दिवसात डिझेल १.९६ रुपयांनी महागले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2KSrKb2
0 Comments