Ticker

6/recent/ticker-posts

नक्षलवादी हल्ल्यात नाशिकचे जवान नितीन भालेराव यांना वीरमरण

नाशिक: छत्तीसगडमध्ये येथे नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटात सीआरपीएफचे जवान शहीद झाले आहेत. या स्फोटात एका अधिकाऱ्यासह ९ जवान जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं. नितीन भालेराव हे नाशिकचे असून सहाय्यक कमांडर म्हणून कार्यरत होते. (CRPF Jawan from Nashik Nitin Bhalerao Martyred in Naxal attack) वाचा: ताडमेटला परिसरात शनिवारी रात्री नक्षलवाद्यांनी दोन आयईडी स्फोट घडवून आणले. या स्फोटात 'कोबरा २०६' बटालियनचे १० जखमी झाले. त्यात नितीन भालेराव यांचा समावेश होता. जखमी जवानांना उपचारासाठी तात्काळ रायपूर येथे विमानानं हलविण्यात आलं. मात्र, भालेराव यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. तर, अन्य सात जवानांवर उपचार सुरू आहेत. दोघांवर चिंतलनार येथील सीआरपीएफच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती एएनआयनं दिली आहे. नितीन भालेराव यांचं कुटुंब नाशिकच्या राजीव नगर भागात वास्तव्यास आहे. 'नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव हे छत्तीसगढ मध्ये शहीद झालेले आहेत. सध्या त्यांचे पोस्टमार्टम सुरू आहे. त्यानंतर त्यांचं पार्थिव रायपूरहून विमानाने मुंबईत आणलं जाईल व तेथून ते नाशिकला आणलं जाईल. त्यानंतर नातेवाईकांशी चर्चा करून त्यानुसार त्यांचा अंत्यविधी सरकारी इतमामाने केला जाईल,' अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. आणखी वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3o4lUBv

Post a Comment

0 Comments