Ticker

6/recent/ticker-posts

लस चाचणी परिणामांवर संशय!; ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाने घेतला 'हा' निर्णय

लंडन: ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनकाने विकसित केलेल्या लशीवर प्रश्न उपस्थित होऊ लागल्यावर कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. करोना लशीची आणखी अतिरिक्त चाचणी करण्यात येणार असल्याचे एस्ट्राजेनकाचे सीईओ पास्कल सोरिओट यांनी जाहीर केले आहे. लस किती प्रभावी आहे, याची चाचणी करण्यासाठी स्वयंसेवकांना आणखी एक लोअर डोस दिला जाऊ शकतो. 'ब्लुमबर्ग'ने दिलेल्या वृत्तानुसार, ऑक्सफर्ड लशीच्या लोअर डोसने पूर्ण डोसच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. पास्कल यांनी सांगितले की, आम्ही अधिक चांगली लस विकसित केली असल्याचा दाट विश्वास आहे. लस अधिक प्रभावी आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्हाला आणखी एक चाचणी घ्यावी लागणार आहे. ही चाचणी, संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवरील असणार असून जलदपणे हे काम करण्यात येईल. वाचा: ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनका लशीवर प्रश्न उपस्थित राहत असताना, भारताच्या सिरम इन्स्टिट्यूटने ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे म्हटले. सिरम इन्स्टिट्यूटच्यावतीने पुण्यात लशीचे उत्पादन केले जात आहे. त्याशिवाय भारतातील चाचणीही सिरमच्यावतीने घेण्यात येत आहे. लस सुरक्षित असून चाचणी दरम्यान सर्व नियमांचे पालन केले जात असल्याचे सिरमने म्हटले. वाचा: वाचा: ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनकाने लस चाचणी दरम्यान काही चुका झाल्याची कबुली दिल्यानंतर सिरमकडून हे वक्तव्य आले आहे. चाचणी दरम्यान काही स्वयंसेवकांना चुकीच्या प्रमाणात डोस दिले होते, अशी कबुली ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनकाने दिली. त्यामुळे चाचणी अंतरीम निष्कर्षाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. सिरमने मात्र ही लस सुरक्षित असल्याचे म्हटले. चाचणीतील अंतरीम निष्कर्षानुसार ही लस ६० ते ७० टक्के प्रभावी असल्याचे त्यांनी म्हटले. वेगवेगळ्या वयोगटातील स्वयंसेवकांवर केलेल्या चाचणीत काही प्रमाणात फरक असणार असणार, त्यामुळे फारशी चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. वाचा: दरम्यान, चीनच्या 'चायना नॅशनल बायोटेक ग्रुप' या कंपनीने सर्वांना लस देण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज दाखल केला असल्याचे वृत्त शिन्हुआ फायानान्सने दिले आहे. या कंपनीची मुख्य कंपनी असणाऱ्या सिनोफार्म कंपनीचे उप व्यवस्थापक शी शेनग्यी यांनी सांगितले की, मध्य-पूर्व आशिया आणि दक्षिण अमेरिकेत सुरू असलेल्या तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणीचा अंतरीम डेटा उपलब्ध झाला आहे. अर्जासोबत हा डेटाही देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. लस वापरासाठी अर्ज दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आल्यानंतर कंपनीचा शेअर दर वधारला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3laoUuk

Post a Comment

0 Comments