Ticker

6/recent/ticker-posts

Happy Birthday Irfan Pathan: पहिल्याच ओव्हरमध्ये हॅटट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज

नवी दिल्ली: भारताचा अष्ठपैलू क्रिकेटपटू आज ३६वा वाढदिवस साजरा करत आहे. गुजरातमध्ये जन्मलेल्या भारताच्या या खेळाडूने जलद गोलंदाज म्हणून क्रिकेटला सुरूवात केली. त्यानंतर संघात अष्ठपैलू म्हणून जबाबदारी पार पाडली. भारतीय संघाला अनेक मोठे विजय मिळून देण्यात इरफानने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. पण त्याच्या करिअरमधील सर्वात लक्षात राहणारा क्षण म्हणजे २००६ चा पाकिस्तान दौरा होय. भारत २००६ साली पाकिस्तान दौऱ्यावर होता. कराची येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इरफानने पहिल्या डावातत हॅटट्रिक करत खळबळ उडवून दिली होती. या सामन्यात त्याने ६ विकेट घेतल्या. पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात एक विकेट घेतली होती. वाचा- इरफानने पहिल्या डावातील पहिल्या ओव्हर मध्ये हॅटट्रिक केली. त्याच्या पहिल्या ३ चेंडूवर धाव निघाली नाही. त्यानंतर सलमान भट्टची विकेट घेतली. भट्टनंतर फलंदाजीला आलेल्या युनुस खान LBW झाला आणि त्यानंतर मोहम्मद युसुफला इरफानने इनस्विंगर चेंडू टाला आणि त्याची बोल्ड घेतली. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये हॅटट्रिक घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला होता. वाचा- हरभजन सिंगनंतर कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक करणारा इरफान पठाण दुसरा गोलंदाज होता. या वर्षाच्या सुरुवातीला इरफानने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वाचा- इरफानने भारताकडून २९ कसोटी, १२० वनडे आणि २४ टी-२० सामने खेळले. त्याने कसोटीत १ हजार १०५ धावा केल्या. १०२ ही त्याची सर्वोच्च खेळी होती. गोलंदाजीत त्याने १०० विकेट घेतल्या. ५९ धावा देत सात विकेट ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी होती. वनडे इरफानने १ हजार ५४४ धावा केल्या. ८३ ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. तर १७३ विकेट घेतल्या. २७ धावा देत ५ विकेट ही वनडेतील त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. निवृत्तीनंतर इरफान समालोचक म्हणून काम करत आहे. सध्या आयपीएल २०२० मध्ये तो समालोचक म्हणून दिसतोय. या शिवाय इरफान सोशल मीडियावर देखील सक्रीय आहे. क्रिकेटसह देशातील विविध घटनांवर तो व्यक्त होत असतो.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/31J3pKs

Post a Comment

0 Comments