Ticker

6/recent/ticker-posts

'मेहबूबांनी पाकिस्तानात जावे, हवे तर मी तिकीट काढून देतो'

अहमदाबाद: गुजरातचे उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांनी जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्ष यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कलम ३७० वर केलेल्या मेहबूबा मुफ्ती यांच्या वक्तव्याची दखल घेत पटेल यांनी मेहबूबांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना जर भारतात चांगले वाटत नसेल तर त्यांनी आपल्या कुटुंबासह पाकिस्तानच्या कराची येथे निघून जावे, असे पटेल यांनी म्हटले आहे. ३ ऑक्टोबर या दिवशी गुजरातमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका होत आहेत. हे वडोदरा येथील कर्जन येथे पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत होते. ज्या लोकांना सीएए, कलम ३७० आणि भारतात राहणे पसंत नसेल त्यांनी सरळ पाकिस्तानातच जावे, असे पटेल म्हणाले. 'अयोग्य वक्तव्य करत आहेत महबूबा मुफ्ती' पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित पटेल यांनी देशाच्या सुरक्षेसाठी नागरिकता दुरुस्ती कायदा आणला. तसेच त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील ३७० कलम देखील हटवले. मेहबूबा मुफ्ती या गेल्या अनेक दिवसांपासून अयोग्य वक्तव्य करत आहेत. त्यांनी विमानाची तिकिटे खरेदी करावी आणि पाकिस्तानात निघून जावे. हवे तर त्यांना आम्ही तिकिटे काढून देतो, असे पटेल म्हणाले. 'ज्याला असुरक्षित वाटते ते भारतातून जाऊ शकतात' जे भारतात आनंदी नाहीत, ज्यांना असुरक्षित वाटते, अशांनी जेवढ्या लवकर जाता येईल तेवढ्या लवकर भारतातून निघून जावे, असेही उपमुख्यमंत्री पटेल म्हणाले. इतकेच नाही, तर जर असे लोक भारताबाहेर जायला तयार नसतील त्यांना तुरुंगात पाठवले जाईल, असे वक्तव्यही पटेल यांनी केले आहे. क्लिक करा आणि वाचा- मेहबूबा मुफ्ती असोत किंवा आणखी कोणी असो, ज्यांना कोणाला येथे असुरक्षित वाटते, भारत माझा माझी आहे, असे ज्यांना वाटत नाही, अशांना भारतात थांबण्याची काही आवश्यकता नाही, असेही पटेल म्हणाले. त्यांना जेथे जायचे आहे तेथे जावे. त्यांना भारतात बळजबरीने कोणीही ठेवत नाही. भारताची प्रगती आणि सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे. हे ज्यांना मान्य नाही, त्यांनी येथून निघून जावे, असेही पटेल पुढे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2HGmp5f

Post a Comment

0 Comments