Ticker

6/recent/ticker-posts

शेअर बाजार ; नफावसुली जोरात, सेन्सेक्स ४०० अंकांनी कोसळला

मुंबई : महिनाअखेरच्या शेवटच्या सत्रात गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीने सेन्सेक्स आणि निफ्टीच्या घोदौडीला ब्रेक लावला. आज शुक्रवारी सेन्सेक्स ४०० अंकांनी कोसळला आहे. निफ्टीमध्ये १०० अंकांची घट झाली आहे. सध्या सेन्सेक्स ३६१ अंकांच्या घसरणीसह ३९३८८ अंकांवर ट्रेड करत आहे. ९५ अंकांनी कोसळला असून तो ११५६७ अंकांवर आहे. आज सकाळी बाजारात तेजी होती. टेलीकॉम, ऑटो या शेअरला मागणी आहे. व्होडाफोन आयडिया, टाटा मोटर्स, एचपीसीएल, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, एनटीपीसी, इंडसइंड बँक, नेस्ले, एचसीएल , एल अँड टी, एसबीआय, ओएनजीसी, बजाज ऑटो, टीसीएस, रिलायन्स, सन फार्मा आदी शेअर तेजीत आहेत. तर कोटक महिंद्रा बँक, अल्ट्रा टेक सिमेंट, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रीड या शेअरमध्ये घसरण झाली आहे. शेअर बाजाराच्या माहितीनुसार परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुरुवारी बाजारात ४२० कोटींची विक्री केली. तर स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २५३ कोटींचे शेअर विक्री केले. आज रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, डीएलएफ, जिंदाल स्टील, जस्ट डायल, इंडसइंड बँक, वक्रांगी, झी मीडिया या कंपन्यांकडून तिमाही निकाल घोषीत करण्यात येणार आहेत. निर्देशांकांत सलग दोन दिवस घसरण झाली. गुरुवारी निफ्टी ५८.८० अंकांनी घसरून ११६७०.८० अंकांवर स्थिरावला. तर दुसरीकडे एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १७२.६१ अंकांनी घसरून ३९,७४९.८५ अंकांवर स्थिरावला.कालच्या सत्रात १५४२ शेअर्स घसरले, १०१९ शेअर्सनी नफा कमावला तर १७० शेअर्स स्थिर अवस्थेत राहिले.एशियन पेंट्स २.८९ टक्के, अल्ट्रा टेक सिमेंट १.६४ टक्के, श्री सिमेंट १.१२ टक्के, एचसीएल टेक ०.८२ टक्के आणि कोटक महिंद्रा बँक १.१४ टक्के हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. एलअँडटी ४.९७ टक्के, टायटन कंपनी ३.३४ टक्के, ओएनजीसी २.७९ टक्के, अदानी पोर्ट्स ३.१५ टक्के आणि टाटा मोटर्स २.०८ टक्के हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. गुरुवारच्या सत्रात आयटी निर्देशांकाव्यतिरिक्त सर्व क्षेत्रीय निर्देशांकांत घसरण दिसून आली. बीएसई मिडकॅप ०.०१ टक्के आणि बीएसई स्मॉलकॅप ०.५५ टक्क्यांनी घटला. मारूती सुझूकीने २ टक्क्याची वृद्धी घेत २०२१ च्या वित्तवर्षातील दुसऱ्या तिमाहीत नफ्याची नोंद केली. तर कंपनीच्या कामकाजातील नफ्यात १०.३४% ची वाढ झाली. कंपनीचा शेअर १.४२ टक्क्यांनी घसरला आणि ७०८४ रुपयांवर बंद झाला होता. युरोपियन निर्देशांकाव्यतिरिक्त प्रमुख जागतिक बाजार निर्देशांकात घसरण झाली. जगभरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या या घसरणीस कारणीभूत ठरली. त्याचे पडसाद आज भारतीय बाजारांवर उमटले. त्यामुळे गुंतवणुकदारांना त्यांच्या गुंतवणुकीची चिंता लागली आहे. नॅसडॅकने ३.७३ टक्के, निक्केई ०.३७ टक्के तर हँगसेंग ०.४९ टक्के घट झाली. एफटीएसई एमआयबी आणि एफटीएसई १०० या निर्देशांकात अनुक्रमे ०.१५ टक्के आणि ०.०४ टक्क्याची वाढ दिसून आली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jKIQDo

Post a Comment

0 Comments