वॉशिंग्टन: करोनाच्या आजारातून बरे झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी पुन्हा एकदा निवडणूक प्रचारास सुरुवात केली आहे. करोनाची बाधा झाल्यानंतर आणि त्यावर उपचार घेतल्यानंतर आपण 'सुपरमॅन' (खूप ताकदवान) झाल्यासारखं वाटत असल्याचे त्यांनी म्हटले. करोनावर झालेल्या उपचाराचा हा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांना एक ऑक्टोबर रोजी करोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. तीन रात्र आणि चार दिवस रुग्णालयात दाखल होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देत व्हाइट हाउसमध्ये उपचार सुरू करण्यात आले. ट्रम्प यांनी एका प्रायोगिक अॅण्टीबॉडी औषधाच्या मिश्रणाने उपचार करण्यात आले होते. त्यानंतर आपण बरे झाले असून निवडणूक प्रचारात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. व्हाईट हाउसमधील डॉक्टरांनी निवडणूक प्रचारात सहभागी होण्याची परवानगी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. वाचा: ट्रम्प यांनी मंगळवारी पेनसिल्व्हेनियात एका निवडणूक प्रचार सभेत सांगितले की, 'मला माहिती आहे की मी काही औषधे घेतली, त्यानंतर लवकरच मी बरा झालो. मला माहीत नाही ते औषध काय होते. हे अॅण्टीबॉडी औषध होते आणि मला आता सुपरमॅनसारखे वाटत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. यावेळी ट्रम्प यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले. माझ्या शरीरात आता रोगप्रतिकारक शक्ती असून मी गर्दीत येऊन कोणालाही भेटू शकतो असेही त्यांनी म्हटले. वाचा: करोनाच्या आजाराला मात दिल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचार सुरू केला आहे. मात्र, राष्ट्रपती ट्रम्प यांच्यासोबत रुग्णालयात दाखल असलेल्या त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प मात्र, सार्वजनिकरीत्या समोर आल्या नाहीत. मेलेनिया यांनी एक आठवड्यापूर्वी करोनाची सौम्य लक्षणे दिसत असल्याचे म्हटले होते. वाचा: वाचा: अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. ८० लाख जणांना करोनाची बाधा झाली असून दोन लाख १६ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत करोनाचा मुद्या प्रभावी ठरत असल्याची चर्चा आहे. करोनाच्या मुद्यावरून ट्रम्प यांच्यावर टीका केली जात आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/33XXnH2

0 Comments