
नोएडा: उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. बादलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात चुलत भावाने आपल्या १० वर्षीय बहिणीवर केला. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. त्याला मंगळवारी दुपारी कोर्टात हजर केले असता, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बादलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १० वर्षीय मुलीवर तिच्या चुलत भावाने सोमवारी रात्री बलात्कार केला. घटनेवेळी मुलीची आई तिथे पोहोचली. तिने आरोपीला पकडले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी पोलीस पोहोचले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली. पोलिसांनी आरोपीला मंगळवारी दुपारी कोर्टात हजर केले. कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2HxemrG
0 Comments