म. टा. प्रतिनिधी, : ठाण्याच्या तपास पथकाच्या (डीबी) कोठडीतून बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने पलायन केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सचिन मनोहर बुधावले यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, अजय गणेश चव्हाण (वय १९, रामनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण याच्याविरोधात अलंकार पोलीस ठाण्यामध्ये काही दिवसांपूर्वी बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याला तपास पथकाने अटक केली होती. गुरुवारी सायंकाळी त्याला तपास पथकाच्या खोलीमध्ये ठेवले होते. त्यावेळी बुधावले हे कर्तव्यावर होते. त्यांना डोळा लागल्याचे पाहून आरोपीने पलायन केले. काही वेळाने हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलंकार पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dAiQcn

0 Comments