Ticker

6/recent/ticker-posts

राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवर अशोक चव्हाणांची टोलेबाजी

औरंगाबाद: ' यांनी मुख्यमंत्री यांच्यावर केलेल्या टीकेवर मी अधिका भाष्य करणार नाही. खरंतर त्यांच्या टीकेवर कोणी प्रतिक्रिया देखील दिलेली नाही. कारण, त्यात दखल घेण्यासारखं काही आहे असं मला वाटत नाही,' असा टोला माजी मुख्यमंत्री व राज्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी हाणला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर म्हणून भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेनेच्या सर्व भानगडी बाहेर काढण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्या संदर्भात अशोक चव्हाण यांना विचारण्यात आले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. वाचा: 'नारायण राणे हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. त्यामुळं त्यांना शिवसेनेबद्दल अधिक माहीत असेल. त्यांना शिवसैनिकच उत्तर देतील. मला राणेंच्या टीकेवर अधिक वक्तव्य करण्याची गरज वाटत नाही,' असं चव्हाण म्हणाले. राणेंच्या टीकेवर शिवसेनेकडून किंवा सरकारच्या बाजूने कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हेही काही बोललेले नाहीत, हे निदर्शनास आणले असता चव्हाण म्हणाले, 'प्रतिक्रिया देण्यासारखं त्यात काही नाही. मुळात राणेंनी केलेली टीका दखल घेण्याइतपत नाही.' उद्धव ठाकरे यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नव्हतं. मी ते दिलं, असंही राणे कालच्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्याबाबत विचारलं असता, 'मी राणेंनी दिलेलं आरक्षण का टिकलं नाही,' असा प्रतिप्रश्न चव्हाण यांनी केला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3kyIjWu

Post a Comment

0 Comments