पॅरिस: करोना संसर्गाचा कहर जगभरात सुरू असून युरोपीयन देशांमध्ये करोनाची दुसरी लाट आली असल्याचे चित्र आहे. फ्रान्समध्ये करोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. सरकारने आता देशात आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. फ्रान्समध्ये दुसऱ्यांदा आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय काही शहरांमध्ये संचार बंदीही लागू करण्यात आली असल्याची घोषणा राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी केली. आरोग्य आणीबाणी लागू केल्यामुळे सरकारला करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्याच्यादृष्टीने स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर मोठे निर्णय घेता येणार आहेत. फ्रान्सने याआधी मार्च महिन्यात आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती. त्यावेळी सरकारने कठोर निर्बंध लादले होते. यामध्ये लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. हे निर्बंध १० जुलै रोजी हटवण्यात आले होते. वाचा: वाचा: करोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर फ्रान्समध्ये निर्बंध शिथील केले होते. खासगी पार्टी, कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत होते. यातूनच करोनाचा संसर्ग फैलावत असल्याचे समोर आले. करोना अधिक फैलावू नये यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. पॅरिससह आठ शहरांमध्ये करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जाणार असल्याचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी सांगितले. करोनाचा संसर्ग न रोखल्यास आरोग्य व्यवस्थेवर आणखी मोठा ताण येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. वाचा: शनिवारपासून संचार बंदी लागू होणार आहे. चार आठवडे असणार आहे. तर, संसदेत आणखी दोन आठवडे संचार बंदी वाढण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी सांगितले. ही मंजुरी मिळाल्यास फ्रान्समध्ये एक डिसेंबरमध्ये संचार बंदी असण्याची शक्यता आहे. वाचा: बुधवारी, फ्रान्समध्ये २२ हजार ५९१ नवीन करोनाबाधित आढळले. सलग सहाव्या दिवशी करोनाबाधितांच्या संख्येने २० हजाराचा आकडा ओलांडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. करोनामुळे फ्रान्समध्ये आतापर्यंत ३२ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/33X3POM

0 Comments