Ticker

6/recent/ticker-posts

संतापजनक! १७ वर्षीय मुलीचे अपहरण, सलग २२ दिवस सामूहिक बलात्कार

कटक: हाथरस घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त होत असतानाच, ओडिशाच्या कटकमध्ये संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर २२ दिवस करण्यात आला. जगतसिंहपूर जिल्ह्यातील तिरतोल परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे तिच्या आई-वडिलांसोबत भांडण झाले होते. त्यानंतर ती रागाने घरातून निघून गेली होती. ही मुलगी ओएमपी चौकात पोहोचली असता, तिला एका तरुणाने घरी सोडण्याच्या बहाण्याने लिफ्ट दिली. त्याने तिला घरी न सोडता चौलीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील पोल्ट्री फार्मवर घेऊन गेला. तिथे एका खोलीत तिला डांबून ठेवले. तिथे आणखी एक व्यक्ती होती. त्या दोघांनी तिच्यावर २२ दिवस सामूहिक बलात्कार केला. ग्रामस्थांनी दिली पोलिसांना माहिती पोलिसांच्या माहितीनुसार, पोल्ट्री फार्मवर एक मुलगी असल्याची माहिती गावातीलच काही नागरिकांनी पोलिसांना दिली. फार्मवर काहीतरी अघटित घडत असल्याचा संशय त्यांना होता. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापे मारले. मुलीला ताब्यात घेतले. एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी फरार असून, त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहितीही पोलिसांनी दिली. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक स्थापन करण्यात आले आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधकांनी सरकारवर साधला निशाणा सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात संताप व्यक्त होत आहे. विरोधी पक्षांनी राज्यातील बीजेडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, हेच या घटनेवरून दिसून येते. पीडित मुलीच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर करावी आणि या घटनेचा तपास क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2H673Xi

Post a Comment

0 Comments