मुंबई- अलीकडेच या दागिन्यांची निर्मिती करणार्या कंपनीने एक नवीन प्रसिद्ध केली. या जाहिरातीवर बरेच वाद सुरू झाले आहेत. सोशल मीडियावर या जाहिरातीवर कारवाई करण्याची विनंती केली जात आहे. काहींच्या मते, तनिष्कची जाहिरात लव्ह जिहादला प्रोत्साहन देत आहे. तर काही लोकांच्या मते, जाहिरातीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला आहे. आता या जाहिरातीवर अभिनेत्री कंगना रणौतने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. कंगना म्हणाली- हे क्रिएटिव दहशतवादी कंगना रणौत, सध्या प्रत्येक विषयावर स्वतःचं मत मांडत आहे. तिने ट्विटरवर या जाहिरातीवर लिहिताना म्हटलं की, 'एक हिंदू म्हणून आपल्याला नेहमीच सतर्क राहणं गरजेचं आहे. कारण हे क्रिएटिव्ह दहशतवादी आपल्या मनात चुकीच्या गोष्टी घालत आहेत. आपल्याला या गोष्टीचा परिणाम, परीक्षण आणि वाद घातला पाहिजे. कारण जे विचार आपल्या डोक्यात घातले जात आहेत त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार याचं मुल्यांकन केलं पाहिजे. आपली संस्कृती वाचवण्याचा हा एकमेव मार्ग आहे.' आणि लैंगिकतेला प्रोत्साहन दिलं जात आहे तनिष्कच्या जाहिरातीवर टीका करत कंगनाने लिहिले की, 'ही जाहिरात अनेक प्रकारे चुकीची आहे. एक हिंदू सून बर्याच दिवसांपासून कुटुंबासोबत राहत आहे. पण जेव्हा ती घराला वारस देणार तेव्हा तिला स्वीकारलं जातं. मग मुलगी ही काय फक्त बाळ जन्माला घालणारी मशीन आहे का? ही जाहिरात केवळ लव्ह जिहादलाच नव्हे तर लिंगभेदालाही प्रोत्साहन देते.' तनिष्कने काढून टाकली जाहिरात सोशल मीडियावर या जाहिरातीवरून होत असलेली टीका पाहिल्यानंतर तनिष्क कंपनीने ही जाहिरात मागे घेतली आहे. या जाहिरातीची यूट्यूब लिंक कंपनीने प्रायव्हेट केली आहे. यामुळे ही जाहिरात लोकांना पाहता येणार नाही. तज्ज्ञांच्या मते, सणासुदीच्या काळात तनिष्कला या जाहिरातीचा मोठा फटका बसू शकतो.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/30XVp7F

0 Comments