Ticker

6/recent/ticker-posts

आता धोनीला चमत्काराची गरज; 'प्ले ऑफ' प्रवेशासाठी एकच मार्ग शिल्लक

नवी दिल्ली: (MS Dhoni ) च्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला () या वर्षी ( ) मध्ये मोठी निराशा मिळाली आहे. चांगल्या कामगिरीच्या आपेक्षेने मैदानावर उतरणाऱ्या हा संघ प्रत्येक सामन्यात खराब कामगिरी करत आहे. अशात काल मुंबई विरुद्ध त्यांचा १० विकेटनी पराभव झाला. गुणतक्त्यात सर्वात शेवटच्या क्रमांकावर असलेल्या चेन्नईचे रनरेट देखील खराब आहे. वाचा- आता धोनीच्या संघाला प्ले ऑफमध्ये जायचे असेल तर फक्त विजय नाही तर मोठा विजय मिळवावा लागले. त्याच बरोबर अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागणार आहे. खर तर अंतिम चार मध्ये पोहोचण्याची चेन्नईच्या आशा संपल्या आहेत. पण गुणतक्त्यावर नजर टाकल्यास चेन्नईला अद्याप संधी असल्याचे दिसते. चेन्नई जर ऐतिहासिक अशी कामगिरी केली तर ते प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतात. वाचा- CSKने आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत आणि त्यांनी फक्त ३ मध्ये विजय मिळवला आहे. ६ गुण आणि - ०.७३३ रनरेट सह ते अखेरच्या स्थानावर आहेत. गुणतक्त्यातील टॉप ३ संघांनी प्रत्येकी ७ सामने जिंकले आहेत. चेन्नई फार तर चौथ्या क्रमांकावर पोहोचू शकते. पण त्यासाठी त्यांना शिल्लक तीन सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतली. काही चमत्कार झाला नाही तर चेन्नई स्पर्धे बाहेर होणार हे निश्चित आहे, कारण त्याचे रनरेट फारच खराब आहे. वाचा- विजय नव्हे तर नशिबाने साध दिली पाहिजे चेन्नईला त्यांचे पाच सामने फक्त मोठ्या फरकाने नाही तर अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागले. यात कोलकाता नाइट रायडर्स संघाने त्यांच्या शिल्लक चार पैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवावा. जर KKRने दोन सामने जिंकले तर चेन्नईचे आव्हान संपुष्ठा येईल. फक्त KKR नाही तर किंग्ज इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद या पैकी कोणत्याही संघांनी दोन पेक्षा अधिक सामने जिंकले तर चेन्नई प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/34rBLn0

Post a Comment

0 Comments