Ticker

6/recent/ticker-posts

बाळासाहेब असताना राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत, पण आता..; राऊतांचं सूचक वक्तव्य

पुणेः महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदु पुणे राहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे होते तो पर्यंत मुंबईत होता. अनेक काळ देशाचं आणि राज्याचं राजकारण मुंबईतून घडत होते. आता सगळे प्रमुख लोक पुण्यात आहेत,' असं सूचक वक्तव्य यांनी केलं आहे. 'राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होणारच होते. हे सरकार असेच होईल हे मला निवडणूकीच्या आधीपासूनच वाटत होते, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. याशिवाय, ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या, पण सरकार पाच वर्ष टिकेल,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 'राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. तेव्हा सरकारमधील जेष्ठ नेते मार्गदर्शन करत आहेत. तिकडे मोदी पण इतर राज्यांना मार्गदर्शन करत असतात, सल्ला देतात. सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असेल तर कोणाच्या पोटात का दुखतंय? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहेत. शिवाय, पवारांचा सल्ला घेतला नाही तर आमच्यासारखे करंटे आम्हीच असं म्हणत, राज्यपालांनाही पवारांच्या सल्ल्याची गरज आहे. त्यामुळं मी पवारांनी विनंती करेन त्यांनाही सल्ला देण्याची, असा टोला संजय राऊत यांनी राज्यपालांना हाणला आहे. राज्यात करोनाची लढाई चांगल्या आधीरे लढली जात आहे. देशातील इतर राज्यातील परिस्थीती पाहिली तर ते लक्षात येते. मुख्यमंत्री यांनीही लढाईचे नेतृत्व सक्षमपणे केलं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहेत. त्याशिवाय, राज्यात सुदैवानं विरोधी पक्ष मजबूत आहे. काहींना विरोधी पक्ष असूच नये असं वाटतं. मात्र, सक्षम लोकशाहीत चांगला विरोधी पक्ष असलाच पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/34JkDcw

Post a Comment

0 Comments