Ticker

6/recent/ticker-posts

नंदुरबारमध्ये थरकाप उडवणारा अपघात; ५ ठार, ३५ जखमी

म. टा. वृत्तसेवा । धुळे सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाने जळगावहुन सुरतकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात धुळे ते नवापूर दरम्यान विसरवाडी येथे बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास झाला आहे. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्स घाटातील पुलाखाली कोसळून सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अजून काही प्रवासी मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत असे की, सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील धुळे ते नवापूर दरम्यान विसरवाडीजवळ कोंडाईबारी घाटात खासगी ट्रॅव्हल्स जळगावहुन सुरतकडे जात असताना बुधवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास कोंडाईबारी घाटातील पुलाखाली ट्रॅव्हल्स कोसळल्याने भीषण अपघात झाला. या ट्रॅव्हल्स मध्ये साधारण ४० प्रवासी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर अपघातात सहा प्रवासी जागीच ठार झाले आहेत. या घटनेत प्रवासी गंभीर जखमी आहेत. रात्री दोन-अडीच दरम्यान हा अपघात घडला त्यावेळी प्रवासी गाढ झोपेत होते. अपघाताची माहिती विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना समजताच ते कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी गेले. आणि अपघातग्रस्त जखमींना विसरवाडी रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jiBvLd

Post a Comment

0 Comments