Ticker

6/recent/ticker-posts

पेट्रोल-डिझेल; 'हा' आहे तुमच्या शहरातील इंधनाचा आजचा दर

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी सलग २० व्या दिवशी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. आज मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि ७६.८६ रुपये प्रती लीटर कायम आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून डिझेलचा भाव ७०.४६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७५.९५ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७३.९९ रुपये प्रती लीटर झाले आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव, चलन विनिमय दर आणि आयातीचा खर्च यासर्व आघाडींवर तडजोड करत पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर जैसे थेच ठेवले आहेत. तब्बल १९ दिवस देशात पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांचा इंधन दर स्थिर ठेवण्याचा हा निर्णय वाहनधारकांसाठी तूर्त दिलासादायक ठरत आहे. अनलॉकचा पाचवा टप्पा देशात सुरु असून रस्त्यावरील वाहनांची रहदारी वाढली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्या देखील काही प्रमाणात सुखावल्या आहेत. इंधन मागणी वाढल्याने अर्थव्यवस्था सावरत असल्याचे बोलले जात आहे. डब्ल्यूटीआय क्रूडच्या दरात मंगळवारी घसरण झाली. तेलाचा बजाव ०.१२ टक्क्यांनी घट घेत ते ४०.८ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावला. साथीच्या आजाराचे वाढते परिणाम आणि लिबियातील तेल उत्पादनात वृद्धी झाल्याने तेलाच्या दरांवर परिणाम झाला. युरोप आणि उत्तर अमेरिकेत कोव्हिड रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाल्यानेही तेलाचे दर घसरले. याशिवाय, लिहियातील क्रूड उत्पादनातील वाढीमुळे तेलाच्या दरांवर परिणाम झाला. तसेच मागणीत उदासीनता व शरारा या सर्वात मोठ्या तेलक्षेत्रातील प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्यानेही दरांत घसरण झाली. अमेरिकेच्या अधिकृत तेलसाठ्यांची अधिकृत माहिती जारी केली जाईल, त्याचा दरांवर परिणाम होईल. क्रूड यादीतील उच्च पातळी तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीमुळे किंमतीत घसरण होऊ शकते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2TeuPDl

Post a Comment

0 Comments