Ticker

6/recent/ticker-posts

मोदी अध्यात्माच्या मार्गाने निघालेले दिसतात; शिवसेनेला शंका

मुंबई: 'पंतप्रधान यांचा चेहरामोहरा अलीकडच्या काळात बदलला आहे. दाढी वाढली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर वेगळे तेज दिसत आहे. एक तर ते अध्यात्माच्या मार्गाने निघाले आहेत किंवा त्यांनी एखाद्या दीर्घ तपस्येची पूर्वतयारी सुरू केलेली दिसते,' असा अंदाज शिवसेनेनं वर्तवला आहे. 'मोदींच्या या तेजानेच देशातील संकटांचा अंधार दूर होईल, अशी भाजपची भावना असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत,' असा टोलाही हाणला आहे. ( Speech) वाचा: मोदी यांनी मंगळवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणावर शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून भाष्य केलं आहे. त्यात मोदींच्या भाषणाचे उपरोधिक शब्दांत कौतुक करतानाच राज्यपाल यांनाही टोले हाणले आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनावर टीका करणाऱ्यांनाही फटकारले आहे. 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठी भाषेत जे सांगतात, तेच मोदी यांनी दिल्लीत बसून हिंदीतून सांगितले. पण मुख्यमंत्र्यांच्या भाषणास नाके मुरडणाऱ्यांनी मोदींच्या भाषणास दाद दिली आहे. मोदींचे भाषण लोकांना आवडणार नाही व सोशल मीडियावर ‘डिसलाइक’चा पाऊस पडेल, ही भीती वाटल्याने ‘डिसलाइक’चे बटनच ‘ब्लॉक’ केले. तसे करण्याची गरज नव्हती. मोदींचे १०-१२ मिनिटांचे भाषण माहितीपूर्ण होते. मोदी राजकीय व प्रशासकीय असे काहीच बोलले नाहीत. त्यांनी आध्यात्मिक मार्गाने राष्ट्राचे प्रबोधन केले. लॉक डाऊनच्या सुरुवातीला मोदींनी ‘महाभारत’ काळात देशाला नेले होते. आता करोनाचा धोका समजण्यासाठी पंतप्रधानांनी ‘रामचरित मानस’चा संदर्भ घेतला, याकडंही शिवसेनेनं लक्ष वेधलं आहे. राज्यपाल कोश्यारींना टोमणा मोदींच्या भाषणातील काही संदर्भ देत शिवसेनेनं मंदिरं उघडण्याचा धोषा लावणारे राज्यपाल कोश्यारी यांनाही चिमटे काढले आहेत. 'मोदींचे कालचे भाषण हे पंतप्रधानांचे नव्हते तर एका चिंताग्रस्त पालकाचे होते. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी ते काळजीपूर्वक ऐकले असेलच. लोक गर्दी करतील अशी ठिकाणे इतक्यात उघडता येणार नाहीत. कारण लोक बेजबाबदारपणे वागत आहेत. हे देशाचे पंतप्रधान सांगतात. तेव्हा त्याचा विचार करायला हवा,' असं सेनेनं म्हटलं आहे. 'मोदी यांनी नवरात्र, दसरा, ईद, दीपावली, छटपूजा व गुरूनानक पर्व आदी सर्वधर्मीय सणांसाठी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. याचा अर्थ आपले पंतप्रधान घटनेनुसार ‘सेक्युलर’च आहेत आणि याची नोंद आपल्या राज्यपालांनी घेणे गरजेचे आहे, असा सणसणीत टोलाही शिवसेनेनं हाणला आहे. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/34gseil

Post a Comment

0 Comments