Ticker

6/recent/ticker-posts

मेट्रो क्रेनचा भीषण अपघात; क्रेनचा भाग कोसळून महिलेचा मृत्यू

मुंबईः मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर मेट्रोच्या क्रेनचा भीषण अपघाच झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहेत. मेट्रोची क्रेन जोगेश्वरीहून वांद्रे येथे घेऊन जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात झाला आहे. अंधेरीतील गुंदावली बस स्टॉपजवळ सकाळी ६ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यात क्रेनचे दोन तुकडे झाले आहेत. या दुर्घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाल आहेत. तसंच, या क्रेनच्या चालकावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चालकाचे क्रेनवरील नियंत्रण सुटल्यानं ती क्रेन मेट्रोच्या पिलरला जाऊन धडकली. यावेळी बस स्टॉपवर उभ्या असलेल्या महिलेच्या अंगावर त्या क्रेनचा एक भाग कोसळला. यात तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोन व्यक्तीही जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3kLryr0

Post a Comment

0 Comments