Ticker

6/recent/ticker-posts

धक्कादायक! आकाशातून पडला मृत पक्षांचा पाऊस; नागरीक धास्तावले

फिलाडेल्फिया: अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे नागरीक धास्तावले आहेत. या शहरात आकाशातून पक्षी जमिनीवर कोसळू लागले. यातील बहुतांशी पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. जवळपास ७२ वर्षांनी अशी घटना घडल्यामुळे नागरीक दहशतीत आहेत. हे पक्षी हिवाळा येण्यापूर्वी दक्षिणेकडे स्थलांतर करत होते. आकाशातून पक्षी कोसळण्याची ही घटना २ ऑक्टोबर रोजी घडली. फिलाडेल्फियामधील वन्यजीव कार्यकर्ते स्टिफन मॅसिजेवस्की यांनी सांगितले की, अचानकपणे आकाशातून शेकडो पक्षी एकाच वेळी खाली कोसळू लागले. काय घडतंय हे कळत नव्हतं. याआधी अशा प्रकारची घटना १९४८ मध्ये घडली होती. हे एखाद्या संकटाची चाहूल असू शकते. दोन ऑक्टोबर रोजी सकाळी पाच ते आठ वाजेदरम्यान ४०० पक्षी जमा केले असल्याची माहिती स्टीफन यांनी दिली. वाचा: स्टीफन यांनी सांगितले की, पक्षांची संख्या मोठी होती. मी एकाच वेळी पाच पक्ष्यांना उचलले होते. त्याशिवाय एका इमारतीमधील सफाई कर्मचाऱ्याने माझ्या समोर ७५ हून अधिक पक्षी आणून ठेवले. त्यातील काही मृत होते तर काही जखमी होते. मी पक्षी जमा करण्यासाठी आलो असल्याचा समज त्या कर्मचाऱ्याचा झाला होता. त्या ठिकाणी इतके पक्षी झाले होते की त्यांना मी उचलू शकत नव्हतो. वाचा: वाचा: तापमानात घट झाली आहे. त्यामुळेच हे पक्षी मोठ्या प्रमाणावर फिलाडेल्फियाहून इतर ठिकाणी जात असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार यातील अनेक पक्षी उंच इमारतींच्या काचांना धडकले. त्यामुळेच ते जखमी होऊन कोसळले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याआधी अमेरिकेच्या संसदेत एक विधेयक आणले गेले होते. त्यानुसार, अधिक उंच इमारतींवर काचांचा वापर होता कामा नये. उंच इमारतीवर असलेल्या काचांमुळे पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे असल्याचे स्टीफन यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3nwmsAP

Post a Comment

0 Comments