Ticker

6/recent/ticker-posts

इंधन दर; जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेल दर

मुंबई : जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. मात्र देशांतर्गत इंधन दर तीन आठवड्यांहून अधिक काळ स्थिर असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज गुरुवारी सलग २७ व्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. तीन आठवड्यांहून अधिक काळ इंधन दर 'जैसे थे'च आहेत. युरोपीयन देशांमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांमध्ये ब्रिटन, फ्रान्ससह इतर देशांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. फ्रान्समध्ये एकाच दिवसात ३३ हजार ४१७ जणांना करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. तर, ५२३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जागतिक बाजारात क्रूडचे भाव ५ टक्क्यांनी कमी झाले आणि प्रती बॅरल ३७.६८ वर बंद झाले. युरोप आणि उत्तर अमेरिकेत वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पुन्हा लॉकडाऊन लादण्यात आले. परिणामी आधीच विस्कळीत झालेल्या जागतिक तेल बाजारात आणखी अडथळे निर्माण झाले. परिणामी तेलाचे दर आणखी घसरले. नव्या लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे तेलाच्या मागणीवर आणखी दबाव आले आहेत. कोव्हिड-१९ रुग्णांमध्ये आणखी वाढ तसेच लिबियातील वाढीव उत्पादन यामुळे कच्च्या तेलाचे दर आणखी घसरले. आजच्या सत्रात तेलाचे दर कमी किंमतीवर व्यापार करतील असा अंदाज आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी सलग २७ व्या दिवशी इंधन दर जैसे थेच ठेवले. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि डिझेल ७६.८६ रुपये प्रती लीटर कायम आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून ७०.४६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७५.९५ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७३.९९ रुपये प्रती लीटर झाले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कंपनीने सप्टेंबरमध्ये डिझेल दरात २.९३ रुपयांची कपात केली होती. तर पेट्रोल ९७ पैशांनी कमी झाले होते. त्याशिवाय सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी (रेशनिंग) केरोसीन दरात २.१९ रुपयांची कपात केली. १ ऑक्टोबरपासून मुंबईत केरोसीनचा दर प्रती लीटर २३.६५ रुपये झाला. त्याआधी तो २५.८४ रुपये होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3oEF2Hk

Post a Comment

0 Comments