Ticker

6/recent/ticker-posts

सिटी सेंटर मॉल आग: आदित्य ठाकरेंनी केले अग्निशमन जवानांचे कौतुक

मुंबई: दक्षिण मुंबईतील सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री लागलेली आग अजूनही धुमसत असून आगीत मोबाइलच्या सुट्या भागांचा सर्वात मोठा बाजार भस्मसात झाला आहे. पर्यावरण मंत्री यांनी शुक्रवारी रात्री घटनास्थळाला भेट देऊन अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन जवानांनी केलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले. घटनास्थळाला दिलेल्या भेटीचे फोटो आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. 'सिटी सेंटर मॉलमधील आगीच्या घटनेबाबत मी सातत्याने माहिती घेत होतो. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आपल्या मुंबई फायर ब्रिगेडच्या धाडसी जवानांनी अग्निशामक रोबोच्या मदतीनं आग नियंत्रणात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले,' असं आदित्य यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मुंबई सेंट्रल बेस्ट बस डेपोसमोरील 'सिटी सेंटर मॉल'मध्ये गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास आग लागली. मोबाइलचे सुटे भाग तसेच इतर ज्वलनशील वस्तूंमुळे आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या संकटामुळे मॉलला लागून असलेल्या ऑर्किड एनक्लेव्ह या ५५ मजली टॉवरमधील सुमारे साडेतीन हजार रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. काल रात्रीपर्यंत ही आग धुमसतच होती. अग्निशमन दलाने गुरुवारी रात्रीपासून फायर इंजिनसह ५० हून अधिक वाहनांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न केले. त्यात काही जवान जखमी झाले आहेत. अहोरात्र मेहनत घेऊनही शुक्रवारी रात्रीपर्यंत ही आग धुमसतच होती. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आणखी वाचा: वाचा: वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/34mTL1K

Post a Comment

0 Comments