Ticker

6/recent/ticker-posts

ड्रग्स केस: NCB ने जप्त केले दीपिका, सारा, श्रद्धाचे मोबाइल फोन

मुंबई- बॉलिवूड ड्रग प्रकरणाची चौकशी करणार्‍या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) शनिवारी बॉलिवूड अभिनेत्री , आणि श्रद्धा कपूर यांची चौकशी केली आहे. एनसीबीच्या पथकाने दीपिका, सारा, रकुलप्रीत आणि इतरांचे फोन जप्त केल्याचं म्हटलं जात आहे. या सेलिब्रिटींचे फोन केले तातडीने सील टाइम्स नाऊच्या अहवालानुसार एनसीबीच्या चौकशीनंतर दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंग, फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा आणि दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांचा फोन ताब्यात घेण्यात आला आहे. फोनचा जुना डेटा पुन्हा मिळवला जाईल यापूर्वी एनसीबीने सुशांतसिंह राजपूतची टॅलेन्ट मॅनेजर जया साहा आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांचे फोनही ताब्यात घेतले होते. या सगळ्यांच्या फोनचा जुना डेटा मिळवला जाईल. तपासासाठी या डेटाचा फार उपयोग होईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. दीपिका, सारा आणि श्रद्धा यांची झाली चौकशी एनसीबीने दीपिका पादुकोणची सुमारे ५.३० तास चौकशी केली. ऑक्टोबर २०१७ मध्ये दीपिकाने तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशकडे ड्रग्ज मागितल्याचे चॅट एनसीबीच्या हाती लागले होते. यानंतर दीपिकाचा चौकशीसाठीचा समन्स पाठवण्यात आला. चौकशी दरम्यान दीपिकानेही ड्रग्ज चॅट केल्याची कबुली दिली. पण ड्रग्ज घेण्यावर स्पष्ट नकार दिला. त्याचवेळी एनसीबीने सारा अली खानची सुमारे चार तास चौकशी केली. सारानेही दीपिकाप्रमाणे ड्रग्ज घेण्याला नकार दिला. ती सिगारेट ओढत असल्याची गोष्ट स्वीकारली. याव्यतिरिक्त, सारा म्हणाली की सुशांतच्या पार्ट्यांमध्ये फक्त ड्रिंक दिले जायचे. कोणतेही अमली पदार्थ देण्यात आले नव्हती. दीपिका आणि साराप्रमाणेच एनसीबी चौकशीत श्रद्धा कपूरनेही ड्रग्ज घेण्यास नकार दिला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2GbaXNZ

Post a Comment

0 Comments