नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे भारतीय क्रिकेटला लागलेला ब्रेक आता हटणार आहे. गेल्या सहा महिन्यापासून स्थगित झालेले क्रिकेट आयपीएलमुळे पुन्हा सुरू होईल. आज आयपीएलची पहिली लढत () विरुद्ध ()यांच्यात होणार आहे. वाचा- आयपीएलमधील या दोन्ही संघाच्या कामगिरीवर नजर टाकली तर दोन्ही संघात आतापर्यंत २८ सामने झाले आहेत. त्यापैकी चेन्नई संघाने ११ तर मुंबई संघाने १७ सामने जिंकले आहेत. पण गेल्या सात हंगामात विद्यमान विजेता मुंबई संघाला पहिला सामन्यात कधीच विजय मिळवता आला नाही. मुंबई संघाला आज हा इतिहास बदलावा लागले. २०१२ पासून मुंबई संघाला पहिल्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. तर चेन्नई संघाने गेल्या तीन सामन्यात विजय मिळवला आहे. वाचा- मुंबई संघाने २०११ मध्ये अखेरचा पहिला सामन्यात विजय मिळवला होता. त्यानंतर सात हंगामात पहिल्या सामन्यात त्यांचा पराभव झालाय. गेल्या वर्षी दिल्लीविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात त्यांचा ३७ धावावांनी पराभव झाला होता. दिल्लीने २१३ धावा केल्या होत्या. तर मुंबईला १७६ पर्यंत मजल मारता आली. वाचा- या उलट चेन्नई संघाने २०१७पासून प्रत्येक हंगामात पहिला सामना जिंकला आहे. गेल्या वर्षी चेन्नईने पहिल्या सामन्यात बेंगळूरू संघाचा ७० धावांवर ऑल आउट केले होते आणि ३ विकेटनी विजय मिळवला होता. वाचा- गेल्या १० हंगामात चेन्नईने ५ वेळा पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. तर मुंबई संघाने १२ हंगामात चार वेळा पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3cbBTJv

0 Comments