Ticker

6/recent/ticker-posts

धक्कादायक! हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या

पालघर: जिल्ह्यातील बोईसर येथे रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका रुग्णाने रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आज पहाटे ही धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. बोईसरच्या भीमनगर जवळील चिन्मय हॉस्पिटलमध्ये चंद्रकांत चौधरी यांना दाखल करण्यात आले होते. गेल्याक काही दिवसापासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र चौधरी यांनी आज पहाटे ६ वाजून ४५ मिनिटाने रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील छतावर जाऊन थेट खाली उडी मारली. छतावरून काही तरी पडल्याचा जोरदार आवाज झाल्याने रुग्णालयातील कर्मचारी तात्काळ रुग्णालयाबाहेर धावले असता त्यांना चौधरी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. या घटनेनंतर तात्काळ बोईस एमआयडीसी पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेत गुन्हा नोंदवला आहे. चौधरी यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना चिन्मय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्यांना सामान्य वॉर्डात शिफ्टही करण्यता आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौधरी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, असं सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी सांगितलं. दरम्यान, चौधरी यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजलं नसून पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3iLQBtc

Post a Comment

0 Comments