
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून डिझेल दरात कपात करून ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आज मंगळवारी कंपन्यांनी डिझेल दरात ८ पैसे कपात केली. यामुळे मुंबईत डिझेलचा भाव प्रती लीटर भाव ७७.०४ रुपये झाला आहे. तर पेट्रोल ८७.७४ रुपयांवर स्थिर आहे. मागील सात दिवसांत पेट्रोलचा भाव 'जैसे थे' आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून डिझेलचा भाव ७०.६३ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७६.१० रुपये झाला आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेल ७४.१५ रुपये प्रती लीटरपर्यंत घसरले आहेत. गेल्या सात दिवसांमध्ये सलग पाच दिवस डिझेल स्वस्त झाले आहे. गेल्या आठवड्यात तीन दिवस दर कपातीला विश्रांती दिल्यानंतर कंपन्यांनी देशभरात डिझेल दरात कपात केली होती. त्या आधीच्या आठवड्यात कंपन्यांनी डिझेल दर कमी केले होते. ज्यात शनिवारी २० पैसे आणि रविवारी २२ पैशांनी डिझेल स्वस्त झाले होते. शुक्रवारी पेट्रोल २६ पैसे आणि डिझेल ३७ पैशांनी स्वस्त झाले होते. गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलमध्ये १३ ते २० पैशांची कपात झाली. बुधवारी इंधन दर स्थिर ठेवले होते. मंगळवारी कंपन्यांनी पेट्रोल दरात १७ पैसे आणि डिझेलमध्ये २२ पैशांची कपात केली. तर सोमवारी पेट्रोल १४ पैसे आणि डिझेल १५ पैशांनी स्वस्त झाले होते. कच्चा तेलाचा (डब्ल्यूटीआय क्रूड) भाव प्रती बॅरल ४० डॉलर प्रती बॅरलपर्यंत खाली आला आहे. दरम्यान, अनलॉकनंतर देशातील इंधन मागणी वाढली असल्याचे सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात दिसून आले आहे. पेट्रोलची विक्रीचे प्रमाण करोना पूर्व स्थितीला गेले आहे. १ ते १५ सप्टेंबर या या काळात पेट्रोल विक्रीत २.२ टक्के वाढ झाली. महिनाभरात ३ रुपयांनी स्वस्त झाले डिझेल मुंबईत ३ सप्टेंबर रोजी पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.७३ रुपये कायम आहे. डिझेलचा भाव ७९.९४ रुपये झाला आहे. त्याआधी २ सप्टेंबर रोजी डिझेलचा भाव ८०.११ रुपयांवर होता. आज डिझेलचा भाव प्रती लीटर ७७.०४ रुपये इतका खाली आला आहे. दर कपातीने डिझेल महिनाभरात सरासरी ३ रुपयांनी स्वस्त झाले आहे. पेट्रोल १.१९ रुपयांनी स्वस्त ऑगस्टमधील दुसऱ्या आठवड्यानंतर पेट्रोल दरात कपात झाली होती. ही दर कपात १ सप्टेंबरपर्यंत कायम होती. दिल्लीत १३ दिवसांत पेट्रोल १.६५ रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर पुन्हा १० सप्टेंबरनंतर पेट्रोल दरात ठराविक टप्प्यात कपात झाली आहे. ज्यात पेट्रोल १.१९ रुपयांनी स्वस्त झाले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mZBRJw
0 Comments