
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी होणाऱ्या अध्यक्षीय वादविवादात डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा आरोप केला. करोनाबाधितांच्या मृतांची संख्या भारताने लपवली असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. अमेरिकेत करोनाबाधितांची आणि मृतांच्या वाढत्या संख्येचा मुद्या या वादविवादात उपस्थित झाला. त्यावेळी ट्रम्प यांनी भारतासह चीन, रशियावरही आरोप केले. विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार आणि माजी उपराष्ट्रपती जो बायडन यांनी आव्हान दिले आहे. बायडन यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर बोलताना ट्रम्प यांनी म्हटले की, भारत, चीन आणि रशियात किती लोकांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे, याची कल्पना तुम्हाला नाही. भारत, चीन आणि रशियाने मृतांची योग्य संख्या जाहीर केली नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. वाचा: बायडन यांच्यावर ट्रम्प यांनी जोरदार हल्ला बोल केला. बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असते तर २० लाख अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला असता. बायडन यांनीदेखील ट्रम्प यांच्याकडे कोणतेच नियोजन नसल्याचा आरोप केला. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी निधीदेखील नसल्याचे बायडन यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष असल्याची टीका बायडन यांनी केली. वाचा: अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या ७४ लाखांहून अधिक झाली आहे. तर, दोन लाखांहून अधिकजणांना प्राण गमवावे लागले आहे. अमेरिकेत करोनाची दुसरी लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. जगभरात तीन कोटी ३५ लाखांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, दोन कोटी ४८ लाख जणांनी आजारावर मात केली आहे. वाचा: दरम्यान, काही दिवसांपूर्वी नेवदा येथे झालेल्या प्रचार सभेत ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांनी आपले कौतुक केले असल्याचे म्हटले होते. अमेरिकेत जगात सर्वाधिक चाचणी झाली आहे. अमेरिकेनंतर भारतात सर्वाधिक करोना चाचणी झाली आहे. अमेरिकेने भारतापेक्षा चार कोटी ४० लाख अधिक करोना चाचणी केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला व्यक्तीश: फोन करून करोना चाचणीत चांगले काम केले असल्याचे म्हटले होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jgVWJe
0 Comments