
नवी दिल्ली: देशात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून अजूनही रुग्णवाढीत घट होण्याची लक्षणे दिसत नाहीत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात करोनाबाधितांची संख्या ६२ लाखांच्या पुढे सरकली आहे. बुधवारी सकाळी प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये (मंगळवार सकाळी ८ ते बुधवार सकाळी ८ वाजेपर्यंत) ८० हजार ४७२ नवे रुग्ण वाढले आहेत. या बरोबरच देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ६२ लाख २५ हजार ७६३ वर पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये एकूण १,१७९ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण मृतांची संख्या ९७ हजार ४९७ वर पोहोचली आहे. तसेच गेल्या २४ तासांमध्ये ८६ हजार ४२८ रुग्ण बरे झाले आहेत. पुन्हा एकदा २४ तासांमध्ये नवे रुग्णांच्या संख्येहून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. देशात सध्याच्या घडीला ९ लाख ४० हजार ४४१ सक्रिय रुग्ण आहेत. म्हणजेच या रुग्णांवर सध्या रुग्णालयात किंवा घरी उपचार सुरू आहेत. आतापर्यंत करोनावर मात करणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या ५२ लाखांच्या आसपास पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण ५१ लाख ८७ हजार ८२५ रुग्ण बरे झाले आहेत. सप्टेंबर महिन्यात करोना रुग्णांची सर्वाधिक वाढ झालेली पाहायला मिळत आहे. या महिन्यात आतापर्यंत एकूण २६ लाख ४ हजार ५१८ नवे रुग्ण आढळले. तर महिन्याभरात एकूण ३३ हजार २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या चाचण्यांचा विचार करता गेल्या २४ तासांमध्ये देशभरात एकूण १० लाख ८६ हजार ६८८ लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिली आहे. तर आतापर्यंत एकूण ७ कोटी ४१ लाख, ९६ हजार ७२९ लोकांचे नमुने घेण्यात आले आहेत. क्लिक करा आणि वाचा- टक्केवारीच्या पद्धतीने सांगायचे झाल्यास देशात रुग्ण बरे होण्याचा दर ८३.३२ टक्के इतका झाला आहे. तर, मृत्युदर देखील १.५६ टक्क्यांवर आहे. तसेच पॉझिटीव्हीटीचा दर ७.४ टक्के इतका असून १५.१ टक्के अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/30jxWgS
0 Comments