Ticker

6/recent/ticker-posts

इंधन दर; जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. याआधी मंगळवारी कंपन्यांनी पेट्रोलच्या किमतीत ८ पैशांची तर डिझेल दरात १५ पैसे कपात केली होती. आज शुक्रवारी मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये असून डिझेलचा भाव प्रती लीटर भाव ७७.७४ झाला आहे.दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून डिझेलचा भाव ७१.२८ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७६.७२ रुपये झाला आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेल ७४.८० रुपये प्रती लीटरपर्यंत घसरले आहेत. गेल्या आठवड्यात कंपन्यांनी डिझेलमध्ये मोठी कपात केली होती. शनिवारी २० पैसे आणि रविवारी २२ पैशांनी डिझेल स्वस्त झाले होते. शुक्रवारी पेट्रोल २६ पैसे आणि डिझेल ३७ पैशांनी स्वस्त झाले होते. गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलमध्ये १३ ते २० पैशांची कपात झाली. बुधवारी इंधन दर स्थिर ठेवले होते. मंगळवारी कंपन्यांनी पेट्रोल दरात १७ पैसे आणि डिझेलमध्ये २२ पैशांची कपात केली. तर सोमवारी पेट्रोल १४ पैसे आणि डिझेल १५ पैशांनी स्वस्त झाले होते. मोठ्या अस्थिरतेतून दर सुधारल्यानंतर शुक्रवारी कच्चे तेल (डब्ल्यूटीआय क्रूड) दर २ टक्क्यांनी घसरले आणि ४१.९२ डॉलर प्रती बॅरलपर्यंत खाली आहे आहेत. कोव्हीड-१९ च्या वाढत्या रुग्णांमुळे तसेच लिबियन तेल उत्पादन पुन्हा सुरू झाल्याने तेलातील नफा मर्यादित राहिला. लिबियन तेल उत्पादन पुन्हा सुरू झाल्याने जागतिक क्रूड मार्केटमध्ये जवळपास दररोज लाखो बॅरल तेलाचा पुरवठा होणार आहे. डॉलरचे मूल्य वधारले व जागतिक तेल मागणीतील घसरणीमुळे तेलातील नफ्याबाबत मात्र जाणकारांनी शंका व्यक्त केली आहे. दरम्यान, इंधन मागणी वाढली असल्याचे सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात दिसून आले आहे. पेट्रोलची विक्रीचे प्रमाण करोना पूर्व स्थितीला गेले आहे. १ ते १५ सप्टेंबर या या काळात पेट्रोल विक्रीत २.२ टक्के वाढ झाली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3i1UtoH

Post a Comment

0 Comments