
नवी दिल्ली : संसदेत विरोधकांचा आणि शेतकऱ्यांचा विरोध डावलत गोंधळातच आवाजी मतदानाद्वारे संमत करण्यात आलेल्या कृषी विषयक विधेयकांना रविवारी यांच्याकडूनही मंजुरी मिळाली. त्यामुळे या विधेयकांना आता कायद्याचं स्वरुप प्राप्त झालंय. यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनानं घेतलंय. राजधानी दिल्लीसहीत देशातील अनेक भागांत शेतकऱ्यांचं विरोध प्रदर्शन सुरू आहे. याच दरम्यान दिल्लीत सोमवारी सकाळी आंदोलकांनी राजपथावरच एक ट्रॅक्टर पेटवून दिला. इंडिया गेटजवळ ट्रॅक्टर आणून आंदोलकांनी कृषी कायद्यांचा निषेध व्यक्त केला. वाचा : वाचा : ट्रॅक्टर जाळण्यात आल्यानंतर ताबडतोब फायर ब्रिगेड आणि पोलिसांची एक टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आग विझवली. दुसरीकडे कर्नाटकात शेतकरी संघटनांनी आज बंद पुकारलाय. तर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आज भगत सिंह नगरमध्ये कायद्याविरोधात धरण्यावर बसणार आहेत. तर पंजाब, हरियाणासहीत देशातील अनेक भागांत आंदोलकांना चक्का जाम आंदोलन केलंय. काँग्रेस, शिरोमणि अकाली दलासहीत अनेक राजकीय पक्षांकडून राष्ट्रपतींना या विधयकावर स्वाक्षरी न करता परत पाठवण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, राष्ट्रपतींनी ही मागणी फेटाळून लावलीय. शेतकरी उत्पादने आणि व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी आणि कृषीसेवा करार या तीनही कृषी विषयक विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी मंजुरी दिलीय. वाचा : वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3cCLM3d
0 Comments